जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / नागपूरात गुन्हेगारांचं धाडस वाढलं; पोलीस आयुक्तांचं फेक अकाउंट काढून पैशांची मागणी

नागपूरात गुन्हेगारांचं धाडस वाढलं; पोलीस आयुक्तांचं फेक अकाउंट काढून पैशांची मागणी


अज्ञात सायबर गुन्हेगारानं नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या नावानं फेसबूक अकाउंट काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

अज्ञात सायबर गुन्हेगारानं नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या नावानं फेसबूक अकाउंट काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Crime in Nagpur: अज्ञात सायबर गुन्हेगारानं नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या (Commissioner of Police) नावानं फेसबूक अकाउंट (Fake Facebook Account) काढून एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्याला गंडा (Fraud) घालण्याचा प्रयत्न केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 09 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून नागपूर (Nagpur) शहराची क्राइम सिटी ही ओळख दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. नागपूर शहारात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे सातत्यानं समोर येत आहेत. यानंतर आता सायबर गुन्हेगारानं (Cyber Criminal) तर हद्दच ओलांडली आहे. अज्ञात सायबर गुन्हेगारानं नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या (Commissioner of Police) नावानं फेसबूक अकाउंट (Fake Facebook Account) काढून एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्याला गंडा (Fraud) घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण संबंधित नेत्यानं प्रसंगावधान दाखवल्यानं हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्तांनी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा तपास सुरू आहे. अज्ञात सायबर चोरट्यानं नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट बनवलं होतं. त्यानंतर आरोपीनं पोलीस आयुक्तांच्या फेक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रुपेश पन्नासे यांच्याकडे पैशाची मागणी केली आहे. आरोपीनं फेसबुक मॅसेंजरद्वारे पैशाची मागणी केल्यानं पन्नासे यांना संशय आला. त्यामुळे शहर उपाध्यक्ष पन्नासे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन करून याबाबत विचारणा केली. हेही वाचा- 25 कोटींनी भरलेली पेटी पाठवतोय; निवृत्त अधिकाऱ्याला FB मित्रानं 56 लाखांना फसवलं पण आपण अशा पद्धतीनं आपण पैसे मागितलं नसल्याचं आयुक्तांनी पन्नासे यांना सांगितलं. यानंतर अज्ञात सायबर चोरट्यानं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट काढून पैशांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. हा गंभीर प्रकार लक्षात येताच पोलीस आयुक्तांनी बनावट अकाउंट ब्लॉक करत सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा- विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणं विनयभंग? नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय खरंतर, अशा पद्धतीनं मोठ्या, प्रसिद्ध व्यक्तींच्या नावानं फेक अकाउंट तयार करून फसवणुकीची अनेक प्रकरणं यापूर्वीही समोर आली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यांत गुंतवण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य करत आहेत. अशा बनावट अकाउंटपासून सतर्क राहण्याचा इशारा सायबर सेलकडून वारंवार देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात