• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 25 कोटींनी भरलेली पेटी पाठवतोय; निवृत्त अधिकाऱ्याला FB मित्रानं घातला 56 लाखांना गंडा

25 कोटींनी भरलेली पेटी पाठवतोय; निवृत्त अधिकाऱ्याला FB मित्रानं घातला 56 लाखांना गंडा

सोशल मीडियातून ओळख झालेल्या मित्रानं अकोल्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 56 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (File photo -Shutterstock)

सोशल मीडियातून ओळख झालेल्या मित्रानं अकोल्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 56 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (File photo -Shutterstock)

Crime in Akola: सोशल मीडियातून ओळख झालेल्या मित्रानं अकोल्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याची (Retired Officer) तब्बल 56 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे.

 • Share this:
  अकोला, 09 ऑगस्ट: सोशल मीडियातून ओळख झालेल्या मित्रानं अकोल्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याची (Retired Officer) तब्बल 56 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. आरोपींनी 25 कोटी रुपयांनी भरलेली पेटी गिफ्ट (Lure of sending Rs 25 Crore) पाठवण्याचं आमिष दाखवून विविध कारणं देत पंधरा दिवसांत तब्बल 56 लाख रुपये लाटले आहेत. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित निवृत अधिकाऱ्यानं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी एका विदेशी नागरिकासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आत्माराम रामभाऊ शिंदे असं फसवणूक झालेल्या फिर्यादी व्यक्तीचं नाव असून ते अकोला जिल्ह्यातील लहरियानगर येथील रहिवासी आहे. 15 दिवसांपूर्वी शिंदे यांनी फेसबुकवर अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर काही ठगबाजांनी फेसबुकच्या माध्यामातून त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपींपैकी एकानं आपण अमेरिकी लष्करात कार्यरत असून सध्या इस्त्राइलमध्ये सेवा बजावत असल्याची बतावणी केली. संबंधित सैनिकांकडे 25 कोटी रुपयांनी भरलेली पेटी आहे. पण हा पैसा अमेरिकेत घेऊन जाऊ शकत नाही. हेही वाचा-कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून लुटले 16 लाख, निघताना सर्वांचे मोबाईलही फोडले त्यामुळे हा सर्व पैसा आम्ही तुम्हाला देऊ इच्छित आहे. पण ही पेटी भारतात पाठवण्यासाठी विविध प्रकारचे टॅक्स भरावे लागणार असल्याची बतावणी आरोपीनं शिंदे यांच्याकडे केली. 25 कोटी रुपये मिळणार असल्याच्या लालसेपोटी शिंदेही आरोपीच्या जाळ्यात अडकले. आमिषाला बळी पडत शिंदे यांनी 56लाख रुपयांची रक्कम विविध राज्यांतील बँक खात्यात पाठवली. ही रक्कम ठकबाजांनी काढून घेत शिंदे यांची फसवणूक केली आहे. हेही वाचा-‘स्पेशल 26’ स्टाईलने दरोडा, बनावट ओळखपत्र दाखवून लुटले 2 लाख रुपये लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात शेवटी 35 लाख रुपये बँक खात्यात जमा केल्यास 35 कोटींनी भरलेली पेटी मिळेल असं आरोपींनी सांगितलं. ही रक्कमही शिंदे द्यायला तयार झाले होते. पण कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे शेवटचे 35 कोटी रुपये वाचले आहेत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच निवृत्त अधिकारी शिंदे यांनी खदान पोलिसांत फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खदान एका नायजेरियन नागरिकासोबत एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नायजेरियन नागरिकास मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर अन्य एका आरोपीला बंगळुरू येथून ताब्यात घेतलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: