तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली, गर्दी टाळणं हाच त्यावर उपाय - विजय वडेट्टीवार

तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली, गर्दी टाळणं हाच त्यावर उपाय - विजय वडेट्टीवार

तिसरी लाट जर आलीच तर शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर जाणार. त्याला इलाज नाहीये असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नागपूर, 4 सप्टेंबर : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Coronavirus third wave) धोका वाढला असल्याचं वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट राज्यात येऊन कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यताही वाढली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याच दरम्यान आता केरळात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या कायम आहे. यावर गर्दी टाळणे आणि लसीकरण हा उपाय असल्याचं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री, तज्ज्ञ, आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला होता त्यावेळी भाजप त्याची गंमत करत होते. भाजप मागणी करत आहे मंदिरे उघडा. तुम्हाला मागणीच करायची असेल तर शाळा उघडण्याची करा ना... मुलांच्या शैक्षणिक विचार करा. गर्दीमुळेच सर्वकाही होत आहे. मुख्यमंत्री अगदी सावधपणे पाऊल टाकून निर्णय गेत आहेत.

पंकजा मुंडेंना झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना अटक

तिसरी लाट येण्याची शक्यता आता वाढली आहे. केरळमध्ये आणि महाराष्ट्रातही वाढली आहे. अशा परिस्थितीत गर्दी टाळणं हाच त्यावरचा उपाय आहे. नाहीतर पुन्हा निर्बंधांना जावं लागेल. पूर्वीपासून तज्ज्ञांचं मत आहे की, तिसरी लाट येणार. दुसऱ्या लाटेचा आपला अंदाज चुकला, तिसऱ्या लाटेच्या संदर्भातील कुणाला काय अंदाज घेता येईल. लसीकरणावर भर देणं हा त्यामागचा उद्देश आहे असंही वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.

तिसरी लाट जर आलीच तर शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर जाणार. त्याला इलाज नाहीये. तो काय तुमच्या आणि आमच्या हातात नाहीये.. सर्व काही परिस्थितीवर अवलंबून आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Published by: Sunil Desale
First published: September 4, 2021, 11:49 AM IST

ताज्या बातम्या