• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना अटक

वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना अटक

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एक मोठा झटका बसला आहे. पंकजा मुंडेच्या ताब्यात असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:
बीड, 4 सप्टेंबर : पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे (Vaidyanath Urban Bank) सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना अटक (Nitin Chitale arrested) करण्यात आली आहे. उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर अफरातफर प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाईने खळबळ उडाली आहे. 1 लाख 14 पोते साखरेच्या पोत्यामध्ये अफरातफर केली असा प्रशासनाने आरोप ठेवला आहे. ED कडून एकनाथ खडसेंविरोधात एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश उस्मानाबादच्या सावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळीमधल्या वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून 46 कोटी रुपयाची साखर ठेवली होती. याच घोटाळाप्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये शंभू महादेव साखर कारखान्याच्या चेअरमन दिलीप अपेट आणि चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वी दिलीप अपेट यांना अटक केली होती आता हे दुसरी अटक करण्यात आलीय. वैद्यनाथ अर्बन बँकेवर भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात या बँकेच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
Published by:Sunil Desale
First published: