सोलापूर, 11 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. मात्र सोलापूरात युवा सेनेच्या वतीनं संगम येथे टायर जाळून बंदची सुरुवात झाली आहे. युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन सुरुआहे. या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली.
सोलापूर: युवासेनेच्या वतीने संगम येथे टायर जाळून बंदची झाली सुरुवात pic.twitter.com/WIaYHYtUQt
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2021
यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री याचा निषेध करत राजीनामा द्यावा आण भारतीय शेतकरी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हा निषेध सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या संगम या ठिकाणी करण्यात आला. बीडमध्ये शिवसेना आक्रमक महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड (Beed) शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं सकाळीच रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना गुलाबाचं फुल देऊन आपली आपली दुकान बंद करण्याच आवाहन करीत आहेत. यात शिवसेनेचे नेते परमेश्वर सातपुते, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान जगताप, बाप्पासाहेब घुगे हे नेते रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी गांधीगिरी मार्गानी रस्त्यावर आहेत. हेही वाचा- Video: बीडमध्ये शिवसेनेची गांधीगिरी; गुलाबाचं फुल देऊन केलं बंदचं आवाहन शिवसेनेकडून सकाळी 6 वाजेपासून रस्त्यावर उतरून दुकानदारांना आवाहन करत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक दिली आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली आहे.