जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Maharashtra Bandh: बेस्ट बसची तोडफोड, 8 बसेसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक

Maharashtra Bandh: बेस्ट बसची तोडफोड, 8 बसेसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक

Maharashtra Bandh: बेस्ट बसची तोडफोड,  8 बसेसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक

Maharashtra Bandh: अज्ञात व्यक्तींनी सोमवारी मध्यरात्री दगडफेक करून आठ बेस्ट बसेसचे (Eight BEST buses damaged) नुकसान केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑक्टोबर: आजच्या महाराष्ट्र (Maharashtra Bandh) बंदच्या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तींनी सोमवारी मध्यरात्री दगडफेक करून आठ बेस्ट बसेसचे (Eight BEST buses damaged) नुकसान केलं आहे. त्यानंतर पोलीस संरक्षणाने मुंबईत बस चालवण्याची योजना हाती घेण्यात आली. काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या 8 बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

जाहिरात

बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासन दिली आहे. सोलापुरात टायर जाळले सोलापुरात युवा सेनेच्या वतीनं संगम येथे टायर जाळून बंदची सुरुवात झाली आहे.

युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन सुरुआहे. या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली. हेही वाचा-  ‘‘दादागिरी करून बंद केला तर मुंहतोड जवाब देण्यात येईल’’ यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री याचा निषेध करत राजीनामा द्यावा आण भारतीय शेतकरी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हा निषेध सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या संगम या ठिकाणी करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: best
  • First Published :
जाहिरात
जाहिरात