रात्रभर जागून रक्षाबंधनाची केली तयारी अन्...; पहाटेच्या कृत्यानं बहिणीला दिली आयुष्यभराची जखम

रात्रभर जागून रक्षाबंधनाची केली तयारी अन्...; पहाटेच्या कृत्यानं बहिणीला दिली आयुष्यभराची जखम

Crime in Nagpur: रविवारी पहाटे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट (Brother Commits Suicide on Rakshabandhan) केला आहे.

  • Share this:

नागपूर, 23 ऑगस्ट: बहिण भावाच्या अतूट नात्याला एकसंध ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून हा दिवस आनंदानं साजरा करते. पण नागपूरातील एका तरुणानं ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच आपल्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. संबंधित तरुणानं रविवारी पहाटे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट (Brother Commits Suicide on Rakshabandhan) केला आहे. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

प्रद्युम्न मयुरेश चेंडके असं आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयासोबत नागपूर एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सूतगिरणी परिसरात वास्तव्याला आहे. प्रद्युम्न हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्यानं मेरिटमध्ये गुण मिळवत सीए (फाऊंडेशन)चा अभ्यासक्रम देखील केला होता. त्याचे वडील स्टेशनरीचं दुकान चालवतात तर आई प्राध्यापिका आहे. असं असूनही प्रद्युम्न यानं रविवारी पहाटे घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-सातारा: रक्षाबंधनाच्या दिवशीच विपरीत घडलं; धबधबा पाहण्यासाठी गेली अन् पाय घसरला

विशेष म्हणजे प्रद्युम्न यानं रविवारी पहाटे अडीचपर्यंत जागं राहून आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनाची तयारी केली होती. यावर्षी आपण आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा करू असंही तो आपल्या बहिणीला म्हणाला होता. त्यासाठी त्यानं रात्री उशीरापर्यंत आपली बहिण आणि आईसोबत घरातील साफसफाई देखील केली होती. पण पहाटे अडीचच्या सुमारास आई, वडील आणि बहिण झोपल्याचं लक्षात आल्यानंतर प्रद्युम्न यानं आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंध करत टोकाचं पाऊल उचललं आहे.

हेही वाचा-रक्षाबंधनच्या दिवशी बीड हादरलं, पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी प्रद्युम्ननं आत्नहत्या केल्याची बाब उघडकीस येताच, त्याच्या पंधरा वर्षाच्या बहिणीनं तर टाहोच फोडला आहे. या घटनेनं संपूर्ण परिवाराला धक्का बसला आहे. प्रद्युम्ननं कोणत्या कारणातून हे टोकाचं पाऊल उचललं आहे, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.

Published by: News18 Desk
First published: August 23, 2021, 12:08 PM IST

ताज्या बातम्या