Big Breaking: वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले

Big Breaking: वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले

boat capsized in wardha: बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

वर्धा, 14 सप्टेंबर : वर्धा जिल्ह्यातून (Wardha District) एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्धा नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. बेनोडा पोलीस स्टेशन (Benoda Police Station) अंतर्गत वरूड तालुक्यातील (Varud Taluka) झुंज गावाजवळ (Zunj Village) ही घटना घडली आहे. ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबतची माहिती मिळू शकलेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यावर जात असताना बोटीला अपघात झाला आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या बोटीतून जवळपास 20 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बोट नदीच्या मधोमध आली असताना अचानक बोट बुडाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप आठ जणांचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थानी गर्दी केली असून शोध मोहिम आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत आणि बोटीतून प्रवास करणाऱ्यांपैकी अनेकांना पोहता येत नसल्याने बोट उलटून मोठी दुर्घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका कुटुंबातील काही जण हे गाडेगाव येथे दशक्रिया विधीसाठी आले होते. तो आटपून परतत असताना वरूडच्या दिशेने जात असताना बोट अचानक उलटली. या दुर्घटनेत 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: September 14, 2021, 1:18 PM IST

ताज्या बातम्या