मराठी बातम्या /बातम्या /nagpur /आनंदाचा सोहळा, आजोबा नितीन गडकरींच्या वाढदिवसाला घरी नातीचे आगमन, VIDEO

आनंदाचा सोहळा, आजोबा नितीन गडकरींच्या वाढदिवसाला घरी नातीचे आगमन, VIDEO


नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती.

नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती.

नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती.

मुंबई, 27 मे : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तर वाढदिवसाच्या दिवशी नितीन गडकरी यांच्या घरी नातीचे आगमन झाले आहे.

नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजिव निखिल  यांना कन्यारत्न प्राप्त झाली. आज नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या नातीचे निवास्थानी आगमन झाले. त्यामुळे घरी एकच आनंदाचे वातावरण पसरले होते.

नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती. घरातील छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत यावेळी धम्माल केली. बच्चे कंपनींनी आपल्या छोट्याशा हातांनी तयार केलेले वाढदिवसाचे खास ग्रिटिंग कार्ड नितीन गडकरींना दिलं. त्यांनीही मोठ्या उत्सुक्तेनं बच्चे कंपनीचं गिफ्ट उघडून पाहिलं. हा आनंदाचा सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.

VIDEO : लग्नात नवरदेवाने केलं असं काही की आनंदाच्या भरात नाचायला लागली नवरी

दरम्यान, ब्लॅक फंगसवरील (Mucormycosis)  उपचारासाठी वापरल्या जाणारे इंजेक्शन 7000 रुपयात मिळणारं मिळत होते. पण आता ते अवघ्या 1200 रुपयात उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शन लॉन्च केलं आहे. देशात एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनचं उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करीत होती. मात्र आता वर्ध्याची जेनटेक लाइफ सायन्सदेखील हे इंजेक्शन तयार करणार आहे. जेनटेक लाइफ सायन्सची दररोज तब्बल 20,000 वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे.

First published:
top videos

    Tags: Nitin gadkari