नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: भारतात तयार होणाऱ्या कोव्हॅक्सिन लसीला (WHO Approves Covaxin for emergency use) अखेर जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोव्हॅक्सिनला (Covaxin Gets approval frrom World Health Organization) मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरु होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण झाली असून या लसीला जागतिक आरोग्य संघटनेनं आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात आली आहे.
WHO has granted emergency use listing (EUL) to #COVAXIN® (developed by Bharat Biotech), adding to a growing portfolio of vaccines validated by WHO for the prevention of #COVID19. pic.twitter.com/dp2A1knGtT
— World Health Organization (WHO) (@WHO) November 3, 2021
गेल्या आठवड्यात झाली बैठक
जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीतच लसीला मान्यता मिळण्याची अपेक्षा होती. मात्र कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीकडे आरोग्य संघटनेनं काही अधिकचे तपशील मागितले होते. त्यांची पूर्तता केल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या आपातकालीन वापराला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळणारी कोव्हॅक्सिन ही पहिली भारतात संशोधित होणारी लस ठरली आहे.
लाखो भारतीयांना दिलासा
भारतात कोव्हिशिल्ड या लसीखालोखाल कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांची संख्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेची या लसीला मंजुरी नसल्यामुळे ही लस घेतलेल्या नागरिकांना परदेशात जाताना अडचणींचा सामना करावा लागत होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या मंजुरीशिवाय आपल्या देशातही त्या लसीला मंजुरी न देण्याचं धोरण बहुतांश देशांनी स्विकारल्यामुळे त्याचा फटका भारतीय प्रवाशांना बसत होता. मात्र आता या मंजुरीमुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लाखो भारतीयांना जणू मोठं दिवाळी गिफ्टच मिळाल्याचं मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Who