Home /News /nagpur /

...अन् मोठा अनर्थ टळला; नागपूरात भूकेनं व्याकूळ तरुणीवर नराधमाकडून बळजबरी

...अन् मोठा अनर्थ टळला; नागपूरात भूकेनं व्याकूळ तरुणीवर नराधमाकडून बळजबरी

भूकेनं व्याकूळ असणाऱ्या तरुणीवर एका नराधमानानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरात घडली आहे.

भूकेनं व्याकूळ असणाऱ्या तरुणीवर एका नराधमानानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरात घडली आहे.

Crime in Nagpur: भूकेनं व्याकूळ असणाऱ्या तरुणीवर एका नराधमानानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न (attempt to rape on Hungry young woman) केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे.

    नागपूर, 26 ऑगस्ट: भूकेनं व्याकूळ असणाऱ्या तरुणीवर एका नराधमानानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न (attempt to rape on Hungry young woman) केल्याची धक्कादायक घटना नागपूरात (Nagpur) घडली आहे. पीडित तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत रात्री उशीरा नागपूरात पोहोचल्यानंतर तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. वेळ मिळताच एका तरुणीनं स्वत: ची सुटका करून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक (Accused Arrested) केली असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. असलम ऊर्फ कल्लू जऊर खान असं अटक केलेल्या 45 वर्षीय नराधमाचं नाव आहे. तो ताजाबाद परिसरात खेळणी विकण्याचं काम करतो. तर 20 वर्षीय पीडित तरुणी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील रहिवासी आहे. संबंधित तरुणी मंगळवारी रात्री आपल्या एका मैत्रिणीसोबत बसने नागपूरात आली होती. रात्री उशीरा नागपूरात पोहोचल्यानंतर दोघांनाही प्रचंड भूक लागली होती. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी काही जणांकडे मदत मागितली. पण त्यांना कोणीही मदत केली नाही. शिवाय संबंधित तरुणींना ताजाबाद याठिकाणी जाण्यास सांगितलं. हेही वाचा-क्रूरतेचा कळस; बलात्कारानंतर नराधमानं पीडितेच्या छातीवर चाकूनं कोरलं स्वतःचं नाव संबंधित दोघी तरुणी रात्री बाराच्या सुमारास भेदरलेल्या अवस्थेत ताजाबादला पोहोचल्या. याठिकाणी खेळणी विकणाऱ्या आरोपी कल्लूची त्यांच्यावर नजर पडली. आरोपीनं जेवणासह काम आणि राहायला जागा देण्याचं आमिष दाखवत दोघींना आपल्या घरी नेलं. पण आरोपी कल्लू रात्री एकच्या सुमारास पीडित तरुणीसोबत बळजबरी करु लागला. धोका ओळखून पीडितेची मैत्रिणीनं आरोपीच्या घरातून पळ काढला. यावेळी आरोपीनं चाकूनं पीडितेच्या मैत्रिणीवर हल्ला केला. तरीही तिनं आपली सुटका करून घेतली आणि वाट मिळेल त्या दिशेनं गेली. हेही वाचा-पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार दरम्यान गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी संबंधित तरुणीला थांबवून विचारपूस केली. तेव्हा तिने त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत पीडित तरुणीनंही स्वत:ची सुटका करून घेतली होती. यावेळी पोलिसांनी आरोपीला त्वरित ताब्यात घेतलं. तसेच दुसऱ्या तरुणीलाही शोधून काढलं. रात्री उशीरा नराधम आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Rape

    पुढील बातम्या