नागपूर, 12 जुलै: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी नागपूर (Nagpur) या शहराची ओळख क्राईम सीटी (Crime City) बनत चालली आहे. पोलिसांनी अनेक गुन्हेगारांवर वेळोवेळी कारवाई करून देखील नागपूरातील हत्येचं (Murders) सत्र थांबायचं नाव घेत नाही. मागील काही महिन्यांच्या तपशीलानुसार, नागपूरात दर महिन्याला आठ जणांची हत्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं माहितीच्या अधिकाराखाली नागपूरातील गुन्हेगारीबाबत माहिती मागवल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2021 या कालावधीत नागपुरातील हत्या, महिलांवरील अत्याचार, चोरी, सोनसाखळी चोरी, किडनॅपिंग अशा अनेक गुन्ह्यांची माहिती मागवली होती. या माहिती अधिकारातून नागपूरातील गुन्हेगारी जगतातील धक्कादायक सत्य समोर आलं आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये नागपुरात महिला अत्याचाराच्या तब्बल 172 घटना घडल्या आहेत. तर 2021 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यात हा आकडा 93 एवढा आहे. त्यामुळे नागपूरात महिला खरंच सुरक्षित आहेत का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. हेही वाचा- प्रसिद्ध मॉडेलची घरात घुसून निर्घृण हत्या; खिडकी तोडून आत आले आरोपी अन्… नागपूरात 2020 साली एकूण 97 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर 2021 सालच्या पहिल्या पाच महिन्यात नागपूरात एकूण 41 जणांची हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रामुख्यानं टोळीयुद्ध आणि वर्चस्व वाद आणि पूर्ववैमनस्यातून झाल्या आहेत. हेही वाचा- पुणे: KISS करताना रोखल्यानं भडकल्या तरुणी; केअर टेकरला मारहाण करत तोडला दात नागपुरात चोरीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील वर्षात शहरात 2 हजार 66 चोरीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर 2021मध्ये पहिल्या पाच महिन्यात 990 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार नागपुरात प्रत्येक महिन्याला सरासरी 198 चोरीच्या घटना घडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.