मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Love..Breakup आणि 5 बळी; 3 जणांची हत्या केल्यानंतर तरुणाची आत्महत्या; 2 दिवसात भावाचीही सापडली सुसाइड नोट

Love..Breakup आणि 5 बळी; 3 जणांची हत्या केल्यानंतर तरुणाची आत्महत्या; 2 दिवसात भावाचीही सापडली सुसाइड नोट

दोन दिवसांपूर्वी या तरुणाने प्रेयसीसह तीन जणांची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्याच कुटुंबातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी या तरुणाने प्रेयसीसह तीन जणांची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्याच कुटुंबातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी या तरुणाने प्रेयसीसह तीन जणांची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्याच कुटुंबातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

(मध्यप्रदेश) भोपाळ, 12 जुलै: काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) सीमेला लागून असलेल्या बैतूल नावाच्या गावातून धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात एका तरुणाने प्रेयसीच्या घरी तिच्याबरोबरच, तरुणीचा मामा आणि शेजाऱ्याची गोळी घालून हत्या (Murder) केली होती. याशिवाय तिघांची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली होती. आता या प्रकरणात पाचव्या हत्येचा खुलासा झाला आहे.

आरोपी भानू ठाकूर याचा लहान भाऊ नागेश यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. सोमवारी सकाळी 11.30 मिनिटांची त्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांना मृतदेहासोबत एक सुसाइड नोटही सापडली आहे. नागेशने यात लिहिलं आहे की, भावाबाबत सुरू असलेल्या बातम्यांमुळे त्याला जबरदस्त धक्का बसला आहे. हे सहन न झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली. (Youth commits suicide after killing 3 people, Brothers suicide note found in 2 days )

हे ही वाचा-नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार

शनिवारी नागेशचा भाऊ भानू ठाकूर याने गर्लफ्रेंड बरखा याच्या घरात घुसून तिची, मामा बंटी आणि शेजारील तरुण लक्की पाल याची गोळी घालून हत्या केली होती. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली होती. 10 जुलै रोजी झालेल्या या हत्याकांडानंतर नागेश डिप्रेशनमध्ये होता. 25 वर्षीय नागेश चहाचं दुकान चालवीत होता. परिसरातील लोकांनी सकाळी 10.30 वाजेपर्यंत त्याला दुकानात पाहिलं त्यानंतर तो दिसला नाही. त्यानंतर साधारण एका तासाने त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून त्यांना तरुणाजवळ सुसाइड नोटही सापडली आहे. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

लॉकडाऊनमध्ये चहाचं दुकान केलं होतं सुरू

सांगितलं जात आहे की, नागेश लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी आला होता. त्याचा भाऊ योगेश आणि नागेश यांनी मिळून ट्रक खरेदी केला होता. लॉकडाऊनमध्ये गाड्या बंद असल्याने घराबाहेर चहाचं दुकान सुरू केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश त्याचा मोठा भाऊ, वहिनी आणि आई यांच्यासोबत राहतो. आत्महत्येच्या वेळी तिघेही घरी नव्हते.

First published:
top videos

    Tags: Crime news, Madhya pradesh, Murder