Home /News /nagpur /

रेतीच्या ढिगारावर घसरगुंडी खेळत असताना हाय व्होल्टेज तारेला स्पर्श, 9 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू

रेतीच्या ढिगारावर घसरगुंडी खेळत असताना हाय व्होल्टेज तारेला स्पर्श, 9 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू

याच ढिगाऱ्यांना स्पर्श करून हाय व्होल्टेजच्या तारा गेल्या आहेत. या तारांपेक्षा रेतीच्या ढिगाऱ्यांची उंची अधिक आहे.

नागपूर, 07 जुलै : नागपूर (nagpur) जिल्ह्यातील सिल्लेवाडा (sillewada nagpur) इथं रेतीच्या ढिगारावर खेळत असताना एका चिमुरड्याचा हाय व्होल्टेज विद्युत तारेला (high voltage wire) स्पर्श झाला. विजेचा जबर धक्का लागल्यामुळे या 9 वर्षांच्या मुलाचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. सिल्लेवाडा इथं ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजता घडली. मृतक बालकाचे नाव दक्ष चंद्रापाल सोनेकर (वय 9) वर्ष राहणार सिल्लेवाडा असे आहे. वेकोलीच्या पाच नंबर बंकर परिसरात खेळत असलेल्या पाच लहान मुलांपैकी दक्षचा मुलाला हाय व्होल्टेज लाईनला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.  दक्ष हा तिसऱ्या वर्गात शिकत होता आणि तो त्याच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. Gymनंतर पाळावेत काही नियम; फायद्याऐवजी होईल नुकसान दक्ष हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलांसोबत वेकलीच्या  प्रतिबंधित क्षेत्र बंकर नंबर 5 मध्ये खेळायला गेला. बंकर नंबर 5 हा संपूर्ण रेतीने भरलेला परिसर असून रेतीचे अंदाजे 25 ते 30 फूट उंचीचे ढिगारे त्या ठिकाणी आहेत. या रेतीच्या ढिगाऱ्यांवर लहान मुले खेळण्यासाठी आकर्षिले जात असतात. यामुळे दररोज लहान मुले रेतीच्या ढिगाऱ्यांवर खेळायला जातात. याच ढिगाऱ्यांना स्पर्श करून हाय व्होल्टेजच्या तारा गेल्या आहेत. या तारांपेक्षा रेतीच्या ढिगाऱ्यांची उंची अधिक आहे. Chanakya Niti: अतिप्रमाणात सहनशीलता बरी नव्हे; लोक ठरवतील भित्रट मुले रेतीच्या ढिगाऱ्यांवरून खाली उतरण्यासाठी घसरत असतांना दक्षचा हाय व्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाला. तारेचा स्पर्श झाल्याने दक्षचा जागीच मृत्यू झाला. सोबत खेळत असलेल्या मुलांना तातडीने धाव घेऊन परिसरातील इतर लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर दक्षच्या आई-वडिलांना घटनास्थळी धाव घेतली. दक्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  नऊ वर्षांच्या  दक्षच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या