केळीवाला झाला डॉक्टर, युट्यूबवर व्हिडीओ पाहून कोरोनाबाधितांवर केले उपचार, अखेर...

केळीवाला झाला डॉक्टर, युट्यूबवर व्हिडीओ पाहून कोरोनाबाधितांवर केले उपचार, अखेर...

रुग्णालय थाटल्यानंतर यूट्यूब आणि इंटरनेटवर बघून चंदन चौधरी हा रुग्णाला इंजेक्शन देणे, सलाईन देणे व औषध उपचार देणे शिकला.

  • Share this:

तुषार कोहळे, प्रतिनिधी

नागपूर, 08 मे : इंटरनेट, यूट्यूबच्या (Youtube) माध्यमातून आपण चांगले पर्यटन स्थळ शोधतो. चांगल्या विद्यपीठांची माहिती शोधतो मात्र नागपूरमध्ये (Nagpur) एका 12 वी पास फळ विक्रेत्याने इंटरनेटवरून डॉक्टरकी शोधली व रुग्णालय (Hospital) थाटले. केळी विक्रेत्यापासून तर बोगस डॉक्टर व पुढे पोलीस कोठडी या चंदन चौधरीला (Chandan chodhari) अखेर जेलची हवा खावी लागली.

पोलिसांच्या अटकेत असलेला चंदन चौधरी कधीकाळी बिहारवरून पळून नागपूरच्या कामठी आला होता. त्याने नागपूरमध्ये केळी विकण्यापासून सुरुवात केली. मधल्या काळात त्याने अनेक उद्योग केले. त्यांनतर त्याने इंटरनेट वरून डॉक्टरकी शोधली, बोगस डिग्री बनवून धर्मार्थ नावाने रुग्णालय थाटले.

मोठी बातमी, पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक

रुग्णालय थाटल्यानंतर यूट्यूब आणि इंटरनेटवर बघून चंदन चौधरी हा रुग्णाला इंजेक्शन देणे, सलाईन देणे व औषध उपचार देणे शिकला. इतकेच काय तर कोरोना काळात पीपीए किट घालून तो कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची ट्रीटमेंट देखील करत असे. नवीन कामठी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या बोगस डॉक्टर रुग्णालयात धाड टाकून कारवाई केली.

सध्या हा बोगस डॉक्टर पोलिसांचा अटकेत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या डॉक्टर च्या रुग्णालयात स्टेअराईस, ऑक्सिजन सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा सापडला असून या डॉक्टराकडे गर्भपाताच्या गोळ्या देखील आढळल्या आहे. धक्कादायक, म्हणजे हा डॉक्टर विद्यार्थ्यांसाठी नॅचरोपॅथीचे कोर्सेस पण घेत होता.

कारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई

चंदन चौधरी याने फेक नॅचरोपॅथीची डिग्री असल्याचा पोलिसांना संशय असून त्या स्वता:च डिग्रीवर त्याने मास्टर इन डिप्लोमा लिहून घेतले. त्याच्याकडे स्वतःचे MD BMS डॉक्टर असल्याचे शिक्के पण तयार केले. महत्वाचे म्हणजे, या बोगस डॉक्टरला नव्याने तयार होणाऱ्या एका कोविड केअर सेंटरवर कॅन्सल्टंट बोलावणे आले असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना काळात आपली आरोग्य यंत्रणा कोलमडली असेल तर त्यात अशा बोगस डॉक्टरांचा मोठा हातभात आहे.

Published by: sachin Salve
First published: May 8, 2021, 3:55 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या