Home /News /mumbai /

ठाण्यात खड्ड्याने घेतला पहिला बळी, दुचाकी खड्ड्यात, तरुण जमिनीवर, मागून एसटी, भयानक दुर्घटना

ठाण्यात खड्ड्याने घेतला पहिला बळी, दुचाकी खड्ड्यात, तरुण जमिनीवर, मागून एसटी, भयानक दुर्घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

ठाण्यात खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे.

ठाणे, 5 जुलै : मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस प्रचंड पडतोय. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थित ठाण्यात पावसामुळे रसत्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. अवघ्या दोन दिवसांच्या पावसाने अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमुळे आज ठाण्यात एक अनपेक्षित घटना घडली आहे. खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेमुळे प्रशासनावर अनेकांकडून रोष व्यक्त केला जातोय. सुफियान शेख असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यंदाच्या पावसाळ्यामुळे रस्त्यावर पडलेल्या  खड्ड्याने हा पहिला बळी घेतला आहे. (इतकं सारं होऊनही शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंकडे 'ही' मागणी, सेनेला पुन्हा झटका?) संबंधित दुर्घटना आज दुपारी घडली. ठाण्यातील काजूपाडा येथे रस्त्याने गाडीने जाणाऱ्या सुफियान शेख या तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. सुफियान याची दुचाकी खड्ड्यात आदळली आणि तोल जावून तो खाली पडला. खाली पडताच मागून येणारी एसटी तरुणाच्या डोक्यावरुन गेली. त्यामुळे सफियान शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रचंड भयानक अशी ही घटना आहे. या घटनेनंतर बस चालकावरही काही लोकांनी रोष व्यक्त केला. पण बसचालकाची चूक नसल्याचं इतर नागरिकांचं म्हणणं आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या