• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • अल्पवयीन मुलीला भररस्त्यात केलं KISS; कोर्टानं तरुणाला घडवली आयुष्यभराची अद्दल

अल्पवयीन मुलीला भररस्त्यात केलं KISS; कोर्टानं तरुणाला घडवली आयुष्यभराची अद्दल

Crime in Mumbai: एका अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तिचं चुंबन घेतल्याप्रकरणी (man kissed minor girl on road) न्यायालयाने संबंधित तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 07 नोव्हेंबर: एका अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तिचं चुंबन घेतल्याप्रकरणी (man kissed minor girl on road) न्यायालयाने संबंधित तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. आरोपी तरुणाने सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तिचं चुंबन घेतलं होतं. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत, न्यायालयाने दोषी तरुणाला आयुष्यभराची अद्दल घडली आहे. सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोषी तरुणाला चार वर्षांचा कारावास सुनावला (court sentenced 4 years of Imprisonment) आहे. एकतर्फी प्रेमातून केलेलं हे कृत्य तरुणाला चांगलंच भोवलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यासोबतच लहान मुलांवर लैंगिक अत्याचार (POCSO) करणाऱ्यांना एक ठोस संदेश देण्याचा प्रयत्नही न्यायालयाने केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. गेल्या सात वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात होतं. दरम्यान, देशभरात आलेल्या कोरोना संसर्गामुळे न्यायालयीन कामकाजात अनेक अडथळे आले. पण शेवटी न्यायालयाने पीडितेच्या बाजूने निकाल देत, 25 वर्षीय आरोपी तरुणाला आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. हेही वाचा-3 वर्षांचा संसार अर्ध्यावर मोडला; पत्नीनंतर पतीनंही संपवलं जीवन, हृदयद्रावक घटना नेमकी घटना काय आहे? संबंधित प्रकार 2014 साली गोरेगाव परिसरात घडला होता. 25 वर्षीय दोषी तरुणाचं महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेम (Crime in one sided love) होतं. संबंधित तरुण पीडित मुलीचा अनेकदा पाठलाग करायचा. दरम्यान, एकेदिवशी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या काही मैत्रिणींसोबत मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका बसस्थानकावर उभी होती. हेही वाचा-लग्न लावून देत नसल्याने तरुणाला राग अनावर; जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीने हत्या यावेळी दोषी तरुण याठिकाणी आला आणि पीडितेचा हात धरत थेट तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. भररस्त्यात तरुणाने केलेल्या या कृत्याने पीडित मुलगी चांगलीच घाबरली. तिने नराधम तरुणाला धक्का देत घराच्या दिशेन पळ काढला. नराधम तरुणाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर, पीडितेनं पोलिसांत फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो  अंतर्गत गुन्हा आरोपी तरुणाला अटक केली. घटनेचा तपास केला असता, आरोपी विरोधात सबळ पुरावे आढळले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला चार वर्षांचा कारावास सुनावला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: