मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /3 वर्षांचा संसार अर्ध्यावर मोडला; पत्नीनंतर पतीनंही संपवलं जीवन, हृदय पिळवटणारी घटना

3 वर्षांचा संसार अर्ध्यावर मोडला; पत्नीनंतर पतीनंही संपवलं जीवन, हृदय पिळवटणारी घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Suicide in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील पोतरा याठिकाणी अवघ्या काही तासांच्या अंतराने पती-पत्नीने आत्महत्या (Husband-wife Commits suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

हिंगोली, 06 ऑक्टोबर: हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील पोतरा याठिकाणी अवघ्या काही तासांच्या अंतराने पती-पत्नीने आत्महत्या (Husband-wife Commits suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी पत्नीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी पतीने देखील आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात पती पत्नीनं आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित दाम्पत्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

पती भीमराव घोगरे आणि पत्नी काजल घोगरे असं आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. मृत घोगरे दाम्पत्य कळमनुरी तालुक्यातील  पोतरा येथील रहिवासी असून दोघंही मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. तीन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर मोल मजुरी करूनच त्यांचा संसाराचा गाडा सुरू होता. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास 20 वर्षीय काजल यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मृत काजल यांचा भाऊ शेषराव मेटकर यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा-नागपुरात मध्यरात्री रंगला खुनी थरार; घराबाहेर बसल्यामुळे गुंडाचा वाजवला गेम

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहाणी केली. यावेळी मृत काजल यांचा पती भीमराव घोगरे बेपत्ता होते. पोलिसांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही भीमराव यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोतरा शिवारामधील एका झाडाला भीमराव घोगरे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे.

हेही वाचा-सख्खा भाऊच जीवावर उठला; ऐन दिवाळीत धाकट्यावर कुऱ्हाडीने घाव घालत केला खेळ खल्लास

या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी भीमराव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित दाम्पत्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली. हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Suicide