मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाशिम हादरलं! लग्न लावून देत नसल्याने तरुणाला राग अनावर; जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीने हत्या

वाशिम हादरलं! लग्न लावून देत नसल्याने तरुणाला राग अनावर; जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीने हत्या

Murder in Washim: वाशिम जिल्ह्यातील जऊळका याठिकाणी एका तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या (Father brutal murder) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

वाशिम, 06 नोव्हेंबर: वाशिम जिल्ह्यातील जऊळका याठिकाणी एका तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या (Father brutal murder) केली आहे. शुक्रवारी रात्री आरोपी मुलाने कुऱ्हाडीने वार (Attack with ax) करत आपल्या जन्मदात्या पित्याला संपवलं आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच, गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जऊळका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक (Accused arrested) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाची चौकशी केली असता, हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

धर्मा भारती असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून ते वाशिम जिल्ह्याच्या जऊळका येथील रहिवासी आहेत. तर प्रमोद भारती असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा प्रमोद हा 27 वर्षांचा असून त्याला विविध प्रकारचे व्यसनं आहेत. आपला मुलगा काहीच काम करत नाही, तसेच त्याला विविध प्रकारची व्यसनं आहेत, त्यामुळे मृत वडील धर्मा हे मुलाचं लग्न लावून देत नव्हते. त्यामुळे प्रमोद याचा आपल्या वडिलांवर राग होता.

हेही वाचा-सख्खा भाऊच जीवावर उठला; ऐन दिवाळीत धाकट्यावर कुऱ्हाडीने घाव घालत केला खेळ खल्लास

याच रागातून प्रमोद याने आपल्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला जऊळका पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Murder, Washim