मुंबई, 31 जुलै: सोशल मीडियावर (Social media) ओळख झालेल्या मित्रावर विश्वास ठेवणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपीनं वाढदिवस (Birthday celebration) साजरा करण्याच्या बहाण्यानं पीडितेला पंचतारांकित हॉटेलात (5 Star Hotel) बोलवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. पीडितेला शुद्ध आल्यानंतर ती हॉटेलच्या रुममध्ये एकटीच होती.
आपल्यासोबत गैरप्रकार घडल्याचं लक्षात येताच पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराच्या कलमासोबतच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास वरळी पोलीस करत आहेत.
संबंधित घटना मुंबईतील वरळी परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित मुलीची ओळख आरोपी तरुणाशी झाली होती. यातून त्यांच्यात मैत्री वाढत गेली. पीडित मुलीनंही आरोपीवर अंधपणानं विश्वास ठेवत गेली.
हेही वाचा-एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीची आत्महत्या
दरम्यान, वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं आरोपीनं पीडितेला वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवलं. पण सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणासोबत वाढदिवस साजरा करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपीनं पीडितेच्या पेयात गुंगीचं औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडितेला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा ती हॉटेलमध्ये एकटीच होती.
हेही वाचा-चार महिन्यांपासून सुरू होता गैरप्रकार; कंटाळून नगरमधील 2 बहिणींनी केलं विषप्राशन
पीडितेनं या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर, कुटुंबीयांनी त्वरित पीडितेला डॉक्टरांकडे नेलं. यानंतर पीडितेनं वर्सोवा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण हा गुन्हा वरळी परिसरात घडल्यानं वर्सोवा पोलिसांनी हा गुन्हा वरळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वरळी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Rape