वसई, 20 मार्च : रविवारी वसईच्या कळंब समुद्र किनारी पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघे बुडाले होते. त्यातील एकाला वाचवण्यात यश आलं होतं तर दुसऱ्याचा मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव साहिब बावकर असं आहे.
याबाबत मिळाले माहिती अशी की, साहिल संजय बावकर हा काल रविवारी ९.३० च्या सुमारास आपल्या मित्रासोबत कळंब समुद्र किनारी फिरायला आला होता. मिनिगोवा समोर समुद्राच्या पाण्यात उतरले असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघेही पाण्यात बुडायला लागले. साहिलसोबत खामकर नावाचा तरुणही बुडत होता. मात्र त्याला स्थानिकांनी वाचवलं.
थोडासा वाद अन् पत्नीसह चिमुरड्यासोबत धक्कादायक कांड, मग स्वतःही उचललं भयानक पाऊल
नालासोपारा तुळींज येथील राहणारा साहिल बावकरचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला. स्थानिक मच्छिमार व अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. काल रात्री पासून त्याचा शोध जीवरक्षक शोध घेत होते मात्र तो सापडला नव्हता. आज सकाळी कळंब येथील रमेश किणी, अभिजित किणी यांना समुद्रात जाळ्याला अडकलेली बॉडी दिसताच लहान बोटीच्या मदतीने भुईगांव समुद्र किनारी आणून पोलिसांच्या ताब्यात दिली. पालिकेचे जिवरक्षक जनार्दन मेहेर, चारुदत मेहेर, अमोल मेहेर कळंब येथील तट रक्षक रमेश किणी, अभिजित किणी हे उपस्थित होते. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vasai