मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Kalyan: अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Kalyan: अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Rape in Kalyan: कल्याण पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला (Young woman raped minor boy) आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे (rape on minor sister) अत्याचार करण्यास भाग पाडलं आहे.

पुढे वाचा ...

कल्याण, 24 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी विकृत घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला (Young woman raped minor boy) आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे (rape on minor sister) अत्याचार करण्यास भाग पाडलं आहे.

कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक आणि विकृत प्रकार घडला आहे. येथील एका 23 वर्षीय तरुणीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक (relative woman raped minor boy) आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही तरुणी पीडित अल्पवयीन मुलाचं जबरदस्तीनं लैंगिक शोषण करत होती. तसेच घटनेची वाच्यता न करण्यासाठी आरोपी तरुणी अल्पवयीन पीडित मुलाला धमकावत होती. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलानं या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही.

हेही वाचा-5000 बांगलादेशी मुलींना भारतात आणत बनवलं वेश्या; मुंबईला सेक्स हब बनवणारा अटकेत

आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने आपल्या प्रियकराकडून पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार करायला भाग पाडलं आहे. या विकृत तरुणीच्या प्रियकराने देखील पीडित अल्पवयीन मुलीवर सातत्यानं लैंगिक अत्याचार केले आहेत. घटनेची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पीडित अल्पवयीन बहीण-भावाला दिली जात होती. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर येत नव्हता.

हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून विद्यार्थ्यांचं धक्कादायक कृत्य; ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन्

अखेर भेदरलेल्या आणि आरोपींच्या अत्याचाराच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित अल्पवयीन भाऊ-बहिणीनं मोठ्या धाडसानं आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी कुटुंबीयांना सांगितली आहे. यानंतर नातेवाईकांनी कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली. अल्पवयीन भाऊ-बहिणीवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी एकून पोलिसांना देखील धक्का बसला. पोलिसांनी विकृत तरुण-तरुणी विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Rape on minor