जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / एकतर्फी प्रेमातून विद्यार्थ्यांचं धक्कादायक कृत्य; ब्लेडने चिरला मुलीचा गळा, वर्गातील फळ्यावर लिहिलं...

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थ्यांचं धक्कादायक कृत्य; ब्लेडने चिरला मुलीचा गळा, वर्गातील फळ्यावर लिहिलं...

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थ्यांचं धक्कादायक कृत्य; ब्लेडने चिरला मुलीचा गळा, वर्गातील फळ्यावर लिहिलं...

या घटनेत एका विद्यार्थ्याच्या प्रेमाने भयंकर रूप धारण केलं आणि त्याने सोबतच शिकणाऱ्या शाळेतील विद्यार्थिनीचा गळा चिरला

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर 24 नोव्हेंबर : प्रेम (Love) ही एक अतिशय सुंदर भावना असून हे मनुष्याच्या जीवनात नवे रंग भरतं, असं म्हटलं जातं. मात्र, हेच प्रेम जर एकतर्फी (One Sided Love) असेल तर हळूहळू ते वेडेपणात बदलतं आणि अनेकदा यातून गंभीर गुन्हे घडतात. याचा शेवट अतिशय भयंकर असतो. सध्या असंच एक हैराण करणारं प्रकरण राजस्थानच्या (Rajasthan) पाली जिल्ह्यातून समोर आलं आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याच्या प्रेमाने भयंकर रूप धारण केलं आणि त्याने सोबतच शिकणाऱ्या शाळेतील विद्यार्थिनीचा गळा चिरला (Minor Girl’s Throat Slit by One Sided Lover). आरोपी या मुलीसोबत लग्न करायचं होतं. मात्र पीडितेनं अनेकवेळा त्याला नकार दिला होता. याच कारणामुळे विद्यार्थ्याने हे धक्कादायक पाऊल उचललं. ही घटना मंगळवारी दुपारी पाली जिल्ह्यातील बिठोला कलां गावात घडली. या घटनेत राजकीय सिनिअर सेकेंडरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आपल्यासोबतच शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ब्लेडनं वार करत तिचा गळा कापला. घटनेत पीडिता जागीच खाली कोसळली. यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. काही वेळानंतर तो रुग्णालयात पोहोचला आणि ही मुलगी जिवंत आहे की तिचा मृत्यू झाला, याची चौकशी करू लागला. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. पोलिसांनी सांगितलं, की विद्यार्थिनी सध्या जास्त काही बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. ती बरी झाल्यानंतर आणि आरोपी विद्यार्थ्याला पकडल्यानंतर सत्य समोर येईल. सध्या तपास सुरू आहे. प्रकरणाची माहिती देत विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी सांगितलं, की आरोपी मागील अनेक दिवसांपासून पीडितेला त्रास देत होता. तो जबरदस्ती तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. या मुलीने त्याला अनेकदा नकार दिला होता. इतकंच नाही तर आपल्या भावाला बोलवूनही या आरोपीला समजावलं होतं. मात्र, तरीही त्यानं कोणाचंही ऐकलं नाही. एकदा त्यानं वर्गातील फळ्यावरच आय लव्ह यू माय वाईफ असंही लिहिलं होतं. तो मुलीला बोलत असे, की माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा तुला मारून टाकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात