• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • बांगलादेशातून 5000 मुलींना भारतात आणून बनवलं वेश्या; मुंबईला अड्डा बनवणारा नराधम अखेर जेरबंद

बांगलादेशातून 5000 मुलींना भारतात आणून बनवलं वेश्या; मुंबईला अड्डा बनवणारा नराधम अखेर जेरबंद

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Mumbai: मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय (human trafficking and prostitution) प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विजय कुमार दत्त यानं पाच हजारांहून अधिक मुलींना देहव्यापारात ढकलल्याची कबुली दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय (human trafficking and prostitution) प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विजय कुमार दत्त यानं पाच हजारांहून अधिक मुलींना देहव्यापारात ढकलल्याची कबुली दिली आहे. 25 वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आलेला आरोपी विजय याने मुंबईतील नालासोपारा परिसरातील दाट वस्तीत आपला अड्डा बनवला होता. एसआयटीच्या पथकानं अखेर त्याला साथीदार बबलूसह बाणगंगा परिसरातील कालिंदी गोल्ड सिटी येथून अटक केलं आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर सुरू असलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपी विजय हा उज्ज्वल, बबलू आणि सैजल या अन्य साथीदारांच्या मदतीने इंदूरला वेश्याव्यवसायाचं केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात होता. इंदूरहून सुरत, राजस्थान, मुंबई आणि इतर प्रमुख ठिकाणी मुलींचा पुरवठा करणारी साखळी तयार करण्याचाही त्याचा प्रयत्न होता. आरोपी विजय कुमार गेल्या 25 वर्षांपासून मुंबईतील नालासोपारा परिसरातील दाट वस्तीत वास्तव्य करत होता. त्याने भारतीय नागरिक असल्याची कागदपत्र देखील बनवले आहेत. तसेच बायकोला भेटायला जाण्याच्या कारणातून तो अनेकदा बांगलादेशला देखील ये-जा करत होता. हेही वाचा-सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय; महिलेनं भररस्त्यात केलेल्या कृत्यानं नगर हादरलं आरोपी विजय हा बांगलादेशातील शबाना आणि बख्तियार यांच्या मदतीनं गरीब घरातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा. नोकरी देण्याचं आमिष दाखवून आरोपी संबंधित मुलींना अवैध पद्धतीनं भारतात आणायचा. याठिकाणी आणणल्यानंतर आरोपी काही दिवस या मुलींना आपल्या सोबत ठेवायचा. तसेच त्यांना वेश्याव्यावसायासाठी तयार करायचा. तसेच तोही अनेकदा त्यांच्यावर बलात्कार करायचा. पीडित मुलींनी पुन्हा बांगलादेशला जाण्याचं विचारता, त्यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकीही आरोपी द्यायचा. हेही वाचा-एक घाव अन् खेळ खल्लास; नांदेडात पोटच्या लेकानं जन्मदात्याला दिला भयावह मृत्यू आरोपीनं गेल्या 25 वर्षात अशाच प्रकारे जवळपास 5000 हून अधिक मुलींना वेश्याव्यावसायात ढकललं आहे. आरोपी विजय यानं आतापर्यंत 10 मुलींशी लग्न केलं आहे. तसेच त्याला 100 हून अधिक प्रेयसी आहेत. संबंधित सर्व प्रेयसींना आरोपीनं देहव्यापारात ढकललं असून त्याचं कमिशनही स्वत:कडेच ठेवत होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना आरोपीचा शोध घेत होते. पण प्रत्येक वेळी आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होतं होता. यावेळी पोलिसांनी नालासोपारा परिसरात धाड टाकल्यानंतर आरोपीनं इंदूरला पलायन केलं होतं. पण एसआयटी पथकाच्या मदतीनं आरोपीला जेरबंद करण्यात यश आलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: