मराठी बातम्या /बातम्या /देश /

Coronavirus: WHOकडून जागतिक आणीबाणी घोषित, कोरोनाशी दोनहात करण्यासाठी मुंबई-पुण्यासह संपूर्ण देश सज्ज!

Coronavirus: WHOकडून जागतिक आणीबाणी घोषित, कोरोनाशी दोनहात करण्यासाठी मुंबई-पुण्यासह संपूर्ण देश सज्ज!

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजारहून अधिकांना याची लागण झाली आहे. त्याचबरोबर भारतातही केरळमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे.

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजारहून अधिकांना याची लागण झाली आहे. त्याचबरोबर भारतातही केरळमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे.

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजारहून अधिकांना याची लागण झाली आहे. त्याचबरोबर भारतातही केरळमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

वुहान, 31 जानेवारी : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजारहून अधिकांना याची लागण झाली आहे. त्याचबरोबर भारतातही केरळमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे.

केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची ओळख पटली असल्यामुळं केंद्र सरकारनं तयारीला सुरुवात केली आहे. दिल्लीमध्येही या विषाणूची लागण झालेल्या संशयित रुग्ण आढळले आहेत. कोराना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक शहरे बंद करण्यात आली आहेत. तर काही शहरांमधील लोक संक्रमण टाळण्यासाठी स्वत:च्या घरात कैद झाले आहेत.

चीनचे अध्यक्ष जिनपिंग म्हणाले की, "चीन गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे पण त्याचवेळी कोरोना विषाणूविरूद्ध चीन ही लढाई जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला." सार्स सारख्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांना गती देऊन चीनने येत्या 15 दिवसांत वुहानमध्ये 1300 खाटांचे आणखी एक तात्पुरते रुग्णालय बांधण्याची घोषणा रविवारी केली.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताने केली तयारी

भारतातील केरळमध्ये कोराणा विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीमध्ये काही संशयास्पद रुग्णही सापडले आहेत. देशातील जवळपास 21 विमानतळांवर चीन आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांची औष्णिक तपासणी केली जात आहे. भारतीय विमानतळांवर सुमारे 100 स्कॅनर बसविण्यात आले आहेत. यासह चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची तयारीही सुरू केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शुक्रवारी बाहेर काढण्यात येईल. तेथून निघण्यास राजी झालेल्या भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान शुक्रवारी वुहान शहरात पोहचेल. यानंतर हुबेई प्रांतात अडकलेल्या उर्वरित भारतीयांना दुसर्‍या विमानातून बाहेर काढण्यात येईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या यादीमध्ये सुमारे 374 विद्यार्थी पहिल्या विमानातून भारतात परत येणार आहेत. तेथून बाहेर काढण्यापूर्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल. त्या विद्यार्थ्यांना परराष्ट्र मंत्रालयाने मास्क, ग्लोव्हज, टिशू पेपर आणि हँड सॅनिटायझर, अन्न व पाण्याच्या बाटल्या यासारख्या वस्तू आपल्यासोबत नेण्याचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांना छोट्या सूचनेवर तिथून निघण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.

चीनच्या वैज्ञानिकांनी वर्षभरापूर्वी दिला होता इशारा

वटवाघळापासून पसरणाऱ्या व्हायरसबद्दल चीनमध्ये सातत्यानं संशोधन सुरु आहे. याच शास्त्रज्ञांनी वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता की वटवागळापासून कोरोला व्हायरसची लागण होवू शकते.महत्वाची बाब म्हणजे वुहानमधील शास्त्रज्ञांनीच हा इशारा दिला होता. कोरोना व्हायरस पसरला तर तो प्रचंड धुमाकूळ घालू शकतो. अनेकांचे जीव घेवू शकतो. चीनचं वातावरण कोरोना व्हायरससाठी अत्यंत अनुकूल असून त्यामुळे साथीसारखी परिस्थिती उद्भवू शकते इतका स्पष्ट संकेत देण्यात आला होता. पण व्हायरस कधी, कुठून येईल याचा मात्र कुणालाचा अंदाज नव्हता.

First published:

Tags: Coronavirus, Who