मुंबई, 17 मार्च : मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथील मायकल रोडवर (Mumbai Carmichael Road) स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडलेल्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. एनआयएच्या (NIA) टीमने एक इनोव्हा गाडी सुद्धा जप्त केली आहे. ती इनोव्हा कार (Innova car) आपणच चालवत होतो, अशी कबुली सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी दिली आहे.
25 फेब्रुवारी रोजी कार मायकल रोडवर जिलेटीन स्फोटकांनी कार सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते, अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली. तसंच, हिरवी स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते. अखेर या प्रकरणी एनआयएच्या टीमने चौकशी केली असता सचिन वाझे यांनी आपणच ती गाडी चालवत होतो अशी कबुली दिली आहे.
पंजाबमध्ये Congress in action, नाराज नवज्योत सिद्धू यांना मिळणार मोठी जबाबदारी!
स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते हिरवी आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशीही माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तलयाजवळ सापडली कार
कार मायकल रोडवर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. त्याच वेळी या गाडीतील चालकाला काही वेळाने एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून नेण्यात आले होते. सचिन वाझे यांना अटक करण्यात आले असे ते कारण म्हणजे पांढऱ्या रंगाची हीच ती इनोव्हा गाडी. ही गाडी मुंबई पोलिसांची असल्याची माहिती समोर आली होती.
Gmail मध्ये स्पेस कमी आहे? या सोप्या ट्रिक्सने अशी करा जागा
NIA ने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार ही मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या (Mumbai Police Commissioner office) जवळून ताब्यात घेतली होती, ही कार गेल्या अनेक दिवसांपासून याच परिसरातच उभी होती. या कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलं आहे. कित्येक दिवस ही कार पोलीस आयुक्तालयातच उभी होती.
मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो
दरम्यान, एनआयएच्या टीमला सचिन वाझे वापरत असलेली एक मर्सिडिज कार सापडली आहे. या कारमध्ये पाच लाखांची रोकड आणि पैसे मोजणारी मशीन सापडली आहे. पण, आता या कारमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून या गाडीसोबत भाजप पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा दावा केला आहे.
Now BJP connection emerges - the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane. Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके (Deven Hemant Shelke) यांचे फोटो आहे. देवेन शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबद्दलचे नियुक्ती पत्रच सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे.
मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid19, Mumbai police, Nia, Police commissioner, मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त