Home /News /national /

पंजाबमध्ये Congress in action, नाराज नवज्योत सिंग सिद्धू यांना मिळणार मोठी जबाबदारी!

पंजाबमध्ये Congress in action, नाराज नवज्योत सिंग सिद्धू यांना मिळणार मोठी जबाबदारी!

पंजाबचे कॅप्टन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) हे बुधवारी दुपारी माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची भोजनाच्या निमित्ताने भेट घेण्याची शक्यता आहे.

    चंदीगड, 17 मार्च : पंजाबमध्ये (Punjab) पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकांची (Punjab assembly election 2022) काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. पंजाबचे कॅप्टन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) हे बुधवारी दुपारी माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू  (Navjot Singh Sidhu) यांची भोजनाच्या निमित्ताने भेट घेण्याची शक्यता आहे. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते सिद्धूंवर पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सिद्धू यांना काँग्रेस पंजाबचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) करण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दुपारच्या भोजनानिमित्त होणारी ही दुसरी भेट आहे. यापूर्वी मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या प्रकारची पहिली भेट झाली होती. दोन्ही गटांमधील नाराजी दूर करण्याचा मार्ग म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. सिद्धू यांची या पद्धतीनं भेट घेणार असल्याचं सिंग यांनी तेव्हा सांगितलं होतं. सिद्धू यांनी 2019 साली स्थानिक पालिका मंत्रालय काढून घेतल्याच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व सिद्धू यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यासोबत होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेस नेते आणि पंजाब प्रभारी हरिश रावत यांनी सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. रावत यांनी 10 मार्च रोजी सिद्धू यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही भेट सकारात्मक झाल्याचा दावा सिद्धू यांनी केला होता. ( पहाटेच्या अजानमुळे उडाली कुलगुरूंची झोप, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र) काँग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशी सिद्धू यांचे चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक स्टार प्रचारक म्हणून देखील त्यांचा निवणुकीत उपयोग होऊ शकतो. नाराज सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी बातमी 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राने देखील दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Assembly Election 2021, Congress, Punjab

    पुढील बातम्या