मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पूनम पांडेला पतीकडून बेदम मारहाण, भिंतीवर आपटलं डोकं, सॅम बॉम्बेला पोलिसांकडून अटक

पूनम पांडेला पतीकडून बेदम मारहाण, भिंतीवर आपटलं डोकं, सॅम बॉम्बेला पोलिसांकडून अटक

Sam Bombay Arrested: अभिनेत्री पूनम पांडेचा (Poonam pandey) पती सॅम बॉम्बे याला काल सायंकाळी मुंबई पोलिसांनी अटक (Sam Bombay Arrest) केली आहे. पूनम पांडेने तिच्या पतीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 नोव्हेंबर: अभिनेत्री पूनम पांडेचा (Poonam pandey) पती सॅम बॉम्बे याला काल सायंकाळी मुंबई पोलिसांनी अटक (Sam Bombay Arrest) केली आहे. पूनम पांडेने तिच्या पतीविरोधात मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा (Beating and domestic violence) आरोप केला आहे. मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला अटक केली आहे. पूनमने आपल्या तक्रारीत म्हटलं की, सॅमची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याचा राग आल्याने सॅमने रागाच्या भरात पूनमचे ​​केस पकडून तिला ओढलं आहे. तसेच तिचं डोकं भिंतीवर आपटल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे.

एवढंच नाही तर सॅमनं पूनमच्या चेहऱ्यावर ठोसा मारला आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या आहेत. सॅमने केलेल्या मारहाणीत पूनम पांडेच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेत्रीला समोरचं पाहणंही कठीण झालं आहे. पूनम पांडे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पूनम पांडेच्या तक्रारीनंतर आता वांद्रे पोलिसांनी सॅम बॉम्बेला अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी सोमवारी संध्याकाळीच सॅमला अटक केली असून संबंधित प्रकरणाचा तपास केला जात आहे.

हेही वाचा- BIG BOSS 14 साठी पतीने मारहाण केल्याचा ड्रामा? पूनम पांडेनं सांगितलं सत्य

विशेष म्हणजे याआधीही पूनमने पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी ते गोवा ट्रिपला गेले असता, पतीने मारहाण केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी पूनमने गोव्यात पती सॅम विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण, सॅम आणि पूनम पांडेचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या 12 दिवसात दोघांमधील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. पण, त्यानंतर सॅमची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

हेही वाचा-समाज सेविकेच्या घरात सुरू होता सेक्स रॅकेट; पालिका निवडणूकही लढली होती

पूनम पांडे आणि सॅम लग्नापूर्वी 2 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लग्नाआधीही सॅम मारहाण करायचा, पण लग्नानंतर सर्व काही ठीक होईल असा विश्वास तिला होता. लग्नाच्या काही दिवसांतच दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा पूनम पांडेने पतीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Entertainment