औरंगाबाद, 09 नोव्हेंबर: औरंगाबाद शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक विचित्र घटना (theft in aurangabad) समोर आली आहे. रविवारी रात्री बेगमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण पाच घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घरात चोरी केल्यानंतर चोरट्याने आपला मोबाइल त्याच घरात विसरून (left mobile phone) गेला आहे. त्याची ही चूक त्याला भलतीच महागात पडली आहे. संबंधित मोबाइल पोलिसांच्या हाती लागल्यानंतर, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात (2 suspects arrested) घेतलं आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. खरंतर, एखाद्या घरात चोरी केल्यानंतर चोरटा कोणताही पुरावा मागे ठेवत नाही. पण बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेत चोरट्यानं भलतीच चूक केली आहे. ही चोरीची घटना समोर आल्यानंतर, शहरात ह्याच चोरीची चर्चा सुरू आहे. चोरट्यांच्या सावळागोंधळ पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. हेही वाचा- पूनम पांडेला पतीकडून बेदम मारहाण, भिंतीवर आपटलं डोकं, सॅम बॉम्बेला अटक नेमकं काय घडलं? औरंगाबाद शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री पाच ते सहा घरांवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. यातील एका घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. आणि घरातील लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. पण ही चोरी करताना चोरट्याने भलतीच चूक केली आहे. हेही वाचा- प्लॉट व्यावसायिकाच्या हत्येचं उलगडलं गूढ; लेकच निघाला खुनी, धक्कादायक कारण समोर चोरट्याने ज्या घरात चोरी केली त्याच घरात आपला मोबाइल विसरून आला आहे. त्याने आपल्या मोबाइल ऐवजी चुकून दुसराच मोबाइल सोबत नेला. घरफोडीची घटना उघडकीस येताच बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पहाणी केली असता, घरात एक वेगळाच कोणाचा तरी फोन असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. तो फोन घरातील कोणत्याही सदस्यांचा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी संबंधित फोनचा तांत्रिक तपास करत दोन संशयितांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.