मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO : धावती ट्रेन पकडत असताना महिलेचा तोल गेला, पनवेल रेल्वे स्थानकावर थरारक घटना

VIDEO : धावती ट्रेन पकडत असताना महिलेचा तोल गेला, पनवेल रेल्वे स्थानकावर थरारक घटना

पनवेल रेल्वे स्थानकाहून (Panvel Railway Station) लखनऊला (Lucknow) जाणाऱ्या ट्रेनमध्ये कामोठे येथे राहणारी महिला आपल्या मुलासोबत ट्रेनमध्ये चढत होती. यावेळी संबंधित दुर्घटना घडली.

पनवेल रेल्वे स्थानकाहून (Panvel Railway Station) लखनऊला (Lucknow) जाणाऱ्या ट्रेनमध्ये कामोठे येथे राहणारी महिला आपल्या मुलासोबत ट्रेनमध्ये चढत होती. यावेळी संबंधित दुर्घटना घडली.

पनवेल रेल्वे स्थानकाहून (Panvel Railway Station) लखनऊला (Lucknow) जाणाऱ्या ट्रेनमध्ये कामोठे येथे राहणारी महिला आपल्या मुलासोबत ट्रेनमध्ये चढत होती. यावेळी संबंधित दुर्घटना घडली.

नवी मुंबई, 20 डिसेंबर : पनवेल रेल्वे स्थानकावर (Panvel Railway Station) एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. चालत्या ट्रेनमध्ये (Train) चढत असताना एका महिलेचा तोल गेला. त्यामुळे ती फलाटावर (Railway paltform) पडली. यावेळी ती रेल्वे रुळाच्या दिशेला खेचली जात होती. पण सुदैवाने फलाटावर असलेल्या एका आरपीएफ (RPF) जवानाच्या प्रसंगावधानाने तिचा जीव वाचला. महिलेचा तोल गेला तेव्हा फलाटावर असलेला आरपीएफ जवान पुढे धावला. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने महिलेला संकाटातून बाहेर काढलं. विशेष म्हणजे महिला फलाटाच्या थेट खाली पडत होती. पण आरपीएफ जवानाने देवदूत बनत महिलेचे प्राण वाचवले. यावेळी रेल्वे स्थानकावर असलेले काही प्रवासी देखील महिलेला वाचविण्यासाठी पुढे धावले होते. हा संबंध प्रकार रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या थरारक घटनेचे दृश्य आता समोर आले आहेत.

व्हिडीओत नेमकं काय?

संबंधित व्हिडीओत एक महिला एक्सप्रेस गाडीत चढण्याचा प्रयत्न करतेय. विशेष म्हणजे ती गाडी फलटावरुन सुटली आहे. तिचा वेग हळूहळू वाढत आहे. यावेळी एक पुरुष गाडीच्या दरवाज्यावर पोहोचून गाडीत चढण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी त्याच्या पाठीमागे असणारी महिला गाडीत चढण्याचा प्रयत्न करते. पण मात्र यावेळी तिचा तोल जातो. ती थेट ट्रेनच्या बाहेर पडते. तिच्या पाठीमागे असलेला व्यक्ती तिला वाचविण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात गाडीने वेग पकडलेला असतो. हा सर्व घटनाक्रम जेव्हा फलाटावर उपस्थित असलेल्या एका आरपीएफच्या नजरेस पडतो तेव्हा तो वेळेचा विलंब न करता त्या महिलेला फलटाहून खाली पडण्यापासून वाचवतो. यावेळी रेल्वे स्थानकवार उपस्थित प्रवशांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली होती.

हेही वाचा : पुणे: दोन महिनेही टिकला नाही संसार, खून करुन पत्नीचा मृतदेह लटकवला पंख्याला

रेल्वे पोलीस काडूराम वेळेवर पोहोचले, आणि...

पनवेल रेल्वे स्थानकाहून लखनऊला जाणाऱ्या ट्रेनमध्ये कामोठे येथे राहणारी महिला आपल्या मुलासोबत ट्रेनमध्ये चढत होती. त्याची सीट आरक्षित होती. वेळवर न पोहोचल्याने फलटावरुन ट्रेन सुटली होती. यावेळी संबंधित महिला घाईत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. ट्रेनचा वेग वाढण्यापूर्वी त्या महिलेला ट्रेनमध्ये चढता आलं नाही. त्यातच तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. यावेळी रेल्वे पोलीस काडूराम मीणा यांनी धावत जावून त्या महिलेला खेचून संकटातून बाहेर काढलं. काडूराम वेळेवर पोहोचले नसते तर कदाचित ती महिला फलाटावरुन पडून रेल्वेरुळावर खेचली गेली असती. काडूराम यांनी महिलेला वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

First published:

Tags: Cctv