मुंबई 25 ऑगस्ट : राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आता फक्त दोन महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप शिवसेनेने यात आघाडी घेतलीय. अर्ध्या अर्ध्या जागा मिळून लढविण्याचं दोन्ही पक्षांनी ठरवलंय. मात्र त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलं नव्हतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत आज स्पष्टिकरण दिलंय. भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप हे भाजपाध्यक्ष अमित शह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ठरविणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा होत होती त्यामुळे त्या चर्चेंना आता पूर्ण विराम मिळणार आहे.
राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसणार, तीन आमदार शिवसेनेत जाणार!
युतीतल्या मित्रपक्षांना जागा सोडून राहिलेल्या जागा अर्ध्या अर्ध्या लढविण्याचं भाजप आणि शिवसेनेत ठरलं आहे. काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. मात्र फारसी काही अडचण येणार नाही असा अंदाच व्यक्त केला जातोय. त्यामुळे लवकरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
बहूजन विकास आघाडीचे बोईसर विधान सभा मतदारसंघांचे आमदार विलास तरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कुठलेही टार्गेट नाही , आमच्या कडे कोणते ही वॉशिंग पॉवडर नाही. शिवसेनेचं काम पाहता आकर्षित पक्ष प्रवेश होत आहेत. चांगलं काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे.
राहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेचा वाट धरली आहे. मतदारसंघ शिवसेनेकडे आहे की भाजपकडे याचा विचार करून नेते त्या त्या पक्षात येत आहेत. राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार लवकरच हातावरचं घड्याळ सोडून शिवबंधन बांधणार असल्याची शक्यता असून राष्ट्रवादीला पुन्हा मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बडे नेते धास्तावले असून गळती रोखायची कशी असा प्रश्न मोठ्या नेत्यांना पडलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा