मुंबई, 15 डिसेंबर : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेतली त्यानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत बैठक झाली. या भेटीगाठीनंतर शिवसेना यूपीएत (UPA) सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, आगामी काळात पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत. काल सोनिया गांधी यांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत शरद पवार, फारुक अब्दुल्ला, सिताराम येचुरी, शिवसेनेकडून मी उपस्थित होतो. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीच्या संदर्भात फोन केला होता. त्यानंतर उद्धवजींनी मला बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. या बैठकीत अनेक सकारात्मक चर्चा झाल्या. पुन्हा बैठक घ्यावी अशी सूचना शरद पवारांनी केली.
विरोधी पक्षांनी एकत्र यावं. भाजप विरोधात ममता बॅनर्जी सुद्धा लढत आहेत आणि आम्ही सुद्धा लढत आहोत तर मतभेदाचं कारण काय. जर 2024 चं लक्ष्य आहे तर मग तुम्ही वेगळं लढावं आणि आम्ही वेगळं लढावं.. त्यापेक्षा एकत्रित येऊन, मतभेद बाजूला ठेवून येता आलं तर यायला हवं अशी समन्वयाची भूमिका सर्वांनी मांडली असं संजय राऊत म्हणाले.
वाचा : राज्याच्या राजकारणाला नवे वळण, शिवसेना UPA च्या वाटेवर, पवार करणार मध्यस्थी?
यूपीएत शिवसेना सहभागी होणार का?
शिवसेना यूपीएचा भाग झाली आहे का? यावर संजय राऊत म्हणाले, तुमच्याकडे तशी माहिती आली आहे का? आम्ही यूपीएचा भाग अद्याप झालेलो नाहीयेत. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करत आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊन सत्ता लचालवत आहेत मला असं वाटतं की हा मिनी यूपीएचा प्रयोग आहे. महाविकास आघाडी हे राज्यस्तरावरचं एक मिनी यूपीए आहे.
काल दिल्लीत महत्तवाच्या नेत्यांची बैठक झाली. आज बैठक होणार नाही. देशाची जनता महागाईने होरपळून गेली आहे. आम्हाला संसदेत बोलून दिलं जात नाही. पंतप्रधान सर्व विषयांवर बोलत आहेत पण, महागई, बेरोजगाराई या विषयार पंतप्रधान बोलताना दिसत नाहीयेत असंही संजय राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut, Shiv sena, UPA