Home /News /mumbai /

वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर रामदास कदम म्हणाले, "बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की...."

वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर रामदास कदम म्हणाले, "बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की...."

Ramdas Kadam Press Conference: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई, 18 डिसेंबर : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Shiv Sena Ramdas Kadam) यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर रामदाक कदम यांना विधा परिषदेवर शिवसेनेने पुन्हा संधीही दिली नाही. या संपूर्ण प्रकरणावरुन रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. रामदास कदम यांनी या पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Ramdas Kadam press conference in Mumbai slams Anil Parab) बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो... रामदास कदम म्हणाले, जी ऑडिओ क्लिप समोर आली होती त्यात मी शिवसेनेबद्दल काहीही म्हटलो नाही. बाळासाहेबांच शपथ घेऊन सांगतो मी आजपर्यंत कधीही किरीट सोमय्या सोबत बोललो नाही, त्याला कुठलीही कागदपत्रे दिली नाहीत. याबाबत मी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं. गेले काही दिवस सातत्याने माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. त्यामुळे माझी बाजू मीडियासमोर यावी यासाठी मी आज बोलत आहे. राजकीयदृष्ट्या मला संपवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. अनिल परब यांचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही दूर्लक्ष करत आहेत. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अनिल परब जिल्ह्यात आले आहेत. मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी शिवसेनेतूनच काहीजण प्रयत्न करत आहेत. अनिल परब कधीच रत्नागिरीत फिरकले नाहीत, त्यांना जिल्हयातील पदाधिकारी माहिती नाहीत असंही रामदास कदम म्हणाले. वाचा : शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपचा झेंडा हाती घेणार? रामदास कदम म्हणाले.... अनिल परब शिवसेनेच्या मुळावर उठलेत रामदास कदम पुढे म्हणाले, अनिल परब यांनी माझ्या मुलगा योगेश कदम याच्या विरोधात उमेदवार घेऊन मातोश्रीवर आले होते. शिवसेनेच्या मुळावर अनिल परब उठले आहेत. उदय सामंत काल आले आणि अनिल परब सोबत काल माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार करतायेत. माझ्या मुलाला संपवण्यासाठी गेली तीन दिवस दापोलीत अनिल परब प्रचार करत आहेत. अनिल परब यांची भाषा अशी की हा राष्ट्रवादीचा नेता आहे. खेडमधील मनसे पदाधिकाऱ्यांचे अनिल परब हे महात्मा गांधी आहेत. मंत्र्यांची यादी पाहून वाईट वाटलं कारण... एक गोपनीय गोष्ट सांगतो, मी, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांना मंत्रिपद देऊ नका असं उद्धवजींना सांगितलं होतं. पण तरीही सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं. मला वाईट वाटलं. जेव्हा यादी आली तेव्हा त्या यादीत सुभाष देसाई यांचं नाव प्रथम होतं असंही रामदास कदम म्हणाले. वाचा : रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का अनिल परबांवर गंभीर आरोप अनिल परब म्हणातात मी आमदाराला पैसा देणार नाही. अनिल परब यांच्या बापाचा पैसा आहे का? शिवसेनेचा उमेदवार पाडून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचा घाट घातला जातोय. मी कधीच गद्दारी केली नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना प्रमुख नाही. अनिल परब यांच्या डोक्यात हवा गेलीय असंही रामदास कदम म्हणाले. शिवसेना सोडणार का? आम्ही शिवसेना विरोधात कधी ही काम करणार नाही. मी शिवसेनेतून कधीच बाहेर पडणार नाही. माझी मुलं निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मला पक्षातून काढलं तरी मी शिवसैनिक म्हणून जगेन. मी भगव्याशी प्रामाणिक आहे. मी दोन वर्षात मातोश्रीवर गेलो नाही उद्धवजींना एकदाच विधान भवनात भेटलो. मी भाजपमध्ये जातोय अशा बातम्या छापून आणल्यात रत्नागिरी ला आणि त्या उद्धवजींना दाखवल्या जातात. मी उद्धवजींशी बोलून निर्णय घेईन.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Anil parab, Ramdas kadam, Shiv sena

पुढील बातम्या