Home /News /mumbai /

Mumbai Lockdown updates: "...तर मुंबईत लॉकडाऊन लागणार" मुंबई मनपा आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

Mumbai Lockdown updates: "...तर मुंबईत लॉकडाऊन लागणार" मुंबई मनपा आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

Coronavirus spike in Maharashtra, will lockdown impose in Mumbai: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. इतकेच नाही तर राज्यात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वेगाना वाढ होत आहे.

    मुंबई, 4 जानेवारी : मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या (Coronavirus) संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील शाळांचे (Mumbai Schools) इयत्ता 1ली ते 9वीचे वर्ग ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसोबतच ठाणे, नवी मुंबईतील शाळाही ऑनलाईन भरवण्यात येणार आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले मनपा आयुक्त ? मुंबईतील कोरोना बाधितांच्या संख्येने 20,000 चा आकडा ओलांडला तर शहरात लॉकडाऊन (Lockdown) लावण्याच्या सारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, दररोज नोंद होणाऱ्या कोरोना बाधितांच्या संखयेपैकी 80 टक्के रुग्ण हो ओमायक्रॉन बाधितांचे आहेत. इक्बाल सिंह चहल यांनी पुढे म्हटलं, सध्या शहरात 30,000 बेड्स उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासबोत लॉकडाऊन, कठोर निर्बंधांबाबत चर्चा केली आहे. कठोर निर्बंध लावण्याच्या विरोधात अद्यापही आम्ही आहोत. जर एका दिवसात 20,000 रुग्णांची संख्या ओलांडली तर कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात विचार केला जाऊ शकतो. पूर्वी सारखा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सध्या नाहीये असंही त्यांनी म्हटलं. … तर इमारत होणार seal मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव, या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं इमारत सील करण्याबाबत नवे प्रोटोकॉल जाहीर केले आहेत. यापूर्वी 1 मार्च 2021 ला पालिकेनं नियम निश्चित केले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग अधिक असल्यामुळे या नियमांत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. एखादी इमारत किंवा इमारतीतील एखादी विंग यांच्यापैकी किमान 20 टक्के किंवा त्याहून अधिक फ्लॅटमधील नागरिक कोरोना बाधित असल्याचं आढळलं, तर ती पूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. या इमारतीत रुग्ण आणि इतर रहिवासी यांना कोरोनाबाबतच्या नियमावलीचं आणि होम क्वारंटाईनसाठीच्या सर्व निकषांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट धडकलीच भारतात कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओमायक्रॉन बाधितांपैकी 75 टक्के रुग्ण हे देशातील प्रमुख महानगरांमध्ये आढळून आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता सारख्या शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात काय स्थिती? राज्यात सोमवारी कोरोनाची 12,160 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यात 24 तासाच्या आत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतच 8082 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सोबत राज्यात 68 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 40 रुग्ण मुंबईतील आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra, Mumbai

    पुढील बातम्या