Home /News /national /

Coronavirus: अखेर भारतात कोरोनाची तिसरी लाट धडकलीच; ओमायक्रॉनचे 75% रुग्ण प्रमुख महानगरांमध्ये, कोविड टास्क फोर्स प्रमुखांची माहिती

Coronavirus: अखेर भारतात कोरोनाची तिसरी लाट धडकलीच; ओमायक्रॉनचे 75% रुग्ण प्रमुख महानगरांमध्ये, कोविड टास्क फोर्स प्रमुखांची माहिती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Covid-19 3rd Wave in India: भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदवस वाढ होताना दिसत आहे. तसेच ओमायक्रॉन बाधितांची संख्याही वेगाने वढत असून त्यापैकी 75 टक्के रुग्ण हे प्रमुख महानगरांमध्ये असल्याचं समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 4 जानेवारी : भारतात कोरोनाच्या रुग्ण संख्येत (Coronavirus) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा (Dr. N. K. Arora) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus third wave in India) आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओमायक्रॉन (omicron) बाधितांपैकी 75 टक्के रुग्ण हे देशातील प्रमुख महानगरांमध्ये आढळून आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता सारख्या शहरांचा समावेश आहे. एनडीटीव्ही सोबत संवाद साधताना डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटलं, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. आता आफण गेल्या आठवड्याबाबत बोललो तर राष्ट्रीय स्तरावरील 12 टक्के रुग्ण हे या संबंधित आहेत. तर गेल्या आठवड्यात ही वाढ 28 टक्के इतकी झाली आहे. त्यामुळेच कोरोना बाधितांची संख्या खूपच वेगाने वाढत आहे हे स्पष्ट आहे. इतकेच नाही तर मोठ्या शहरांमध्ये विशेषत: दिल्ली, मुंबई, कोलकाता सारख्या शहरांत 75 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित आहेत. वाचा : राज्यात सोमवारी 12 हजार नवीन रुग्णांची नोंद, Omicron बाधितांची संख्या चिंता वाढवणारी यापूर्वी, कोविड लस स्ट्रॅटेजी पॅनलचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, बूस्टर डोसच्या महत्वाबाबत चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. त्यांनी पुढे सांगितले की, अनेक देश हे लसीचे चार डोस देण्याबाबतही विचार करत आहेत. न्यूज 18 सोबत बोलताना अरोरा म्हणाले, बूस्टर डोसच्या संदर्भात आपली समज आणि विज्ञान याच्यात खूप अंतर आहे. गर्भवती महिलांमध्ये लसीकरणाबद्दल चिंता डॉ. एन. के. अरोरा यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले की, देशातील 4.5 कोटी गर्भवती महिलांपैकी केवळ 10 टक्के महिलांनी लसीकरण करुन घेतलं आहे. यायाच अर्थ सुमारे 40 कोटी महिलांनी आतापर्यंत लसीकरण करुन घेतलेलं नाहीये. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच लहान मुले आणि गरोदर महिलांना कोरोनाचा धोका अधिक मानला जात आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग खूपच वेगाना होत आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वेगाने वाढ होत असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशात 33,750 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात काय स्थिती? राज्यात सोमवारी कोरोनाची 12,160 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यात 24 तासाच्या आत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतच 8082 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सोबत राज्यात 68 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 40 रुग्ण मुंबईतील आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, India, Maharashtra

    पुढील बातम्या