• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांचं ठाकरी स्टाईल रोखठोक उत्तर

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांचं ठाकरी स्टाईल रोखठोक उत्तर

जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची मागणी सुद्धा केली होती.

  • Share this:
    मुंबई, 06 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या भेटीमुळे भाजप (bjp) आणि शिवसेना (shivsena) युतीची चर्चा रंगली आहे. पण, आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी आपल्या हजरजबाबीपणा दाखवत रोखठोक उत्तर दिले आहे. तसंच, भाजपचे अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेनं खाली करणारी होती, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे सूप आज वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसलले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भाजप शिवसेना पुन्हा युती होणार अशी चर्चा रंगली आहे असा सवाल पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी दोघांच्या ( अजित पवार, बाळासाहेब थोरात) मध्ये आहे, मला बाहेर निघायचं असेल तर या दोघांना टाळण शक्य आहे का?' असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार टिकेल का या प्रश्नाला ठाकरी स्टाईल उत्तर दिलं. विरोधकांना जोरदार टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाहीये. मुद्दा काय होता. केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागण्याचा होता. यामध्ये नवीन आम्ही काय केलं. जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची मागणी सुद्धा केली होती. राज्यपालांना सुद्धा आम्ही ही विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर यात चुकीचं काय आणि एवढ्या मिरच्या जोंबण्याचं कारण काय? ओबीसी समाजाच्या बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता. देवेंद्र फडणवीसांना टोला अधिवेशनात सोमवारी झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत म्हटलं, कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळीमा फासणार आहे. उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
    Published by:sachin Salve
    First published: