मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक लांबणार? राज्यपालांनी मागितला वेळ

BREAKING : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक लांबणार? राज्यपालांनी मागितला वेळ

विधानसभा अध्र्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमावर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही.

विधानसभा अध्र्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमावर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही.

विधानसभा अध्र्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमावर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही.

    मुंबई, 26 डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ( Assembly Speaker (Election) निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या (mva government) शिष्टमंडळाने आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची (governor bhagat singh koshyari) भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. पण, राज्यपालांनी थोडा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनाची पायरी चढली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली आहे. आज महाविकास आघाडीचे नेते शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांनी चर्चा केली. (हेही वाचा - पालकांनो सावधान! मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना होऊ शकते फसवणूक; अशी घ्या काळजी) 'राज्यपाल यांना विनंती करण्यासाठी आलो होतो. की त्यांनी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही करून कार्यक्रम जाहीर करावा. पण त्यांना थोडा वेळ हवा आहे. त्यांना अभ्यास करायचा आहे.  मला अपेक्षा आहे की ते उद्यापर्यंत या कार्यक्रमाला मान्यता देतील आणि निवडणूक होईल उमेदवार काही मोठी बाब नाही. आमच्या पक्षात काय एका फोनवर उमेदवार ठरेल, अशी माहिती थोरात यांनी दिली. तर, विधानसभा अध्र्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमावर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. राज्यपालांना निवडणूक कार्यक्रमाच्या पद्धतीवर, बदललेल्या नियमाविषयी अभ्यास करायचा आहे. काही तांत्रिक बाबींची माहिती घ्यायची आहे.  12 निलंबित आमदार किंवा विधानपरिषदेचे १२ आमदार यावर चर्चा झाली नाही. नियमात बदल केलेत त्याविषयी राज्यपालांना कादेशीर दृष्ट्या अभ्यास करायचा आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. (हेही वाचा - IPL 2022 : पंजाब किंग्सने केलं नाही रिटेन, आता 39 बॉलमध्ये केले 196 रन!) राज्यपालांना कार्यक्रम पत्रिका देण्यात आली होती, पण अद्याप राज्यपालांनी सही न केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना संशय बळावला. राज्यपालांची सही गरजेची असते. परंतु, आधीच्या वादाची पार्श्वभूमी पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर सही करण्याची विनंती केली. पण, राज्यपालाने अद्याप कोणताच निर्णय न घेतल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या