मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'आज देश या विकृत लोकांच्या तावडीत गेला', उदयनराजे थेट बोलले

'आज देश या विकृत लोकांच्या तावडीत गेला', उदयनराजे थेट बोलले

लाज वाटत नाही, या लोकांना शिवरायांचं नाव घेताना. स्वार्थ साधल्यानंतर एकही व्यक्ती धारिष्ठ दाखवत नाही.  का ठामपणे मत व्यक्त करत नाही

लाज वाटत नाही, या लोकांना शिवरायांचं नाव घेताना. स्वार्थ साधल्यानंतर एकही व्यक्ती धारिष्ठ दाखवत नाही. का ठामपणे मत व्यक्त करत नाही

लाज वाटत नाही, या लोकांना शिवरायांचं नाव घेताना. स्वार्थ साधल्यानंतर एकही व्यक्ती धारिष्ठ दाखवत नाही. का ठामपणे मत व्यक्त करत नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India

रायगड, 03 डिसेंबर : 'राष्ट्रपुरुषांचा खिल्ली उडवल्यासारखा अवमान केला जात आहे. त्यांचा अपमान म्हणजे आम्हा सगळ्यांचा अपमान आहे. आपण काही करणार आहे की नाही. आपण सगळे फक्त राजकारण्यांच्या तावडीत किती दिवस राहणार आहात. पूर्वी मुघलांच्या तावडीत हा देश होता, आज या विकृत लोकांच्या तावडीत देश गेला आहे. हे सांगताना खंत वाटते. यातून सुटका झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते. आज लोकशाहीमध्ये तुम्ही सज्ञान आहात ते राजे आहात. तुमच्यामुळे हे आमदार असेल, खासदार असेल, यांच्यामुळे तुम्ही नाही. तुमच्यामुळे ते आहे. लाज वाटत नाही, या लोकांना शिवरायांचं नाव घेताना?'असं म्हणत राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं, त्यांच्या या विधानाविरोधात उदयनराजे यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केलं आहे.

राष्ट्रपुरुषांचा खिल्ली उडवल्यासारखा अवमान केला जात आहे. त्यांचा अपमान म्हणजे आम्हा सगळ्यांचा अपमान आहे. आपण काही करणार आहे की नाही. आपण सगळे फक्त राजकारण्यांच्या तावडीत किती दिवस राहणार आहात. पूर्वी मुघलांच्या तावडीत हा देश होता, आज या विकृत लोकांच्या तावडीत देश गेला आहे. हे सांगताना खंत वाटते. यातून सुटका झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते. आज लोकशाहीमध्ये तुम्ही सज्ञान आहात ते राजे आहात. तुमच्यामुळे हे आमदार आहे, खासदार आहे, यांच्यामुळे तुम्ही नाही. तुमच्यामुळे ते आहेत. लाज वाटत नाही, या लोकांना शिवरायांचं नाव घेताना. स्वार्थ साधल्यानंतर एकही व्यक्ती धारिष्ठ दाखवत नाही.  का ठामपणे मत व्यक्त करत नाही. असं झालं तसं झालं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर प्रोटोकॉल आहे, असं  शिवाजी महाराजांनी बाळगले असते तर आज आपण गुलामगिरीत असतो. हे विसरता कामा नये, कुठला प्रोटोकॉल, चुकू ती चुकू आहे. तुम्ही जर याचं समर्थन करत असेल तर ते तेवढेच दोषी आहे. या सर्वांना जागा दाखवायची आहे, असं उदयनराजे म्हणाले.

(Jitendra Awhad and Eknath Shinde : ...तर पाकिट मारण्याचाही गुन्हा दाखल करतील, आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाणे टाळले)

'ज्यांनी सर्वधर्माचा आदर करण्याचा संदेश महाराजांनी दिला. त्याच व्यक्तीचा राज्यात विटंबना होत आहे. चित्रपट असेल, लिखान असेल आणि वक्तव्य असेल. पण सगळे जण शांतपणे बसले आहे. नंतर सांगता अप्रत्यक्षपणे बोलल्याचं सांगता, त्यांचं समर्थन करण्याचे धाडस करताय, पण कोण कुठं गेलं, काय गेलं याला अर्थ नाही, हे अजिबात सहन केले जाणार नाही. आपण मुग गिळून गप्प बसलो आहे. यावर आपण काही प्रतिक्रिया देत नाही, आता आपण प्रतिक्रियावादी झालो आहे, हे देशासाठी घातक आहे, असंही उदयनराजे म्हणाले.

(Solapur Akkalkot Border : '75 वर्षांत काही दिलं आता आम्हाला जाऊ द्या', सोलापूरमधील गावकऱ्यांनी फडकावले कर्नाटकचे झेंडे)

शिवरायांनी सर्वधर्मीयांना एकत्र येण्याचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाचं काम आहे. शिवरायांनी आपलं आयुष्य राज्यासाठी वेचलं. त्यांचा अवमान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. शिवरायांना वंदन करायचं पण त्यांनी दिलेल्या सर्व धर्मसमभावाचा संदेश दिला जात नाही. राजकीय पक्षांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे, अशी टीका उदनयराजेंनी केली.

भारत स्वातंत्र्य झाले, त्यावेळी 3 तुकडे झाले होते. आता 30 तुकडे होतील. आज वाईट वाटत आहे. देशाचे कितीही तुकडे होऊ द्या, मी फक्त माझं स्वार्थ पाहणार असे राजकारणी झाले आहे. पण शिवरायांनी तसा कधी विचार केला नाही. त्यामुळे शिवरायांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं, असंही उदयनराजे म्हणाले.

First published: