जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mission Kavach Kundal: 'मिशन कवच कुंडल'ची आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा, जाणून घ्या काय आहे ही योजना

Mission Kavach Kundal: 'मिशन कवच कुंडल'ची आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा, जाणून घ्या काय आहे ही योजना

Mission Kavach Kundal: 'मिशन कवच कुंडल'ची आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा, जाणून घ्या काय आहे ही योजना

Mission Kavach Kundal: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 ऑक्टोबर : राज्यात आजपासून मंदिरे पुन्हा उघडण्यात आली आहेत. तर दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या. राज्यात लसीकरण सुद्धा मोठ्या वेगाने सुरू आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्याप टळलेला नाहीये. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असून जास्तीत जास्त वेळेत लसीकरण (Vaccination) पूर्ण करणे गरजेचं आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेत ‘मिशन कवच कुंडल’ (Mission Kavach Kundal) योजनेची घोषणा केली आहे. जाणून घेऊयात काय आहे ही योजना. काय आहे मिशन कवच कुंडल योजना? (What is Mission Kavach Kundal) आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मिशन कवच कुंडल नावाने एक योजना आम्ही उद्यापासून करत आहोत. 8 ऑक्टोबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ही योजना राबवायची आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे की, देशात 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत 100 कोटी नागरिकांचं लसीकरण व्हावं असं केंद्र सरकारचं टार्गेट आहे. त्यानुसार ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरांचं भक्तांसाठी दार खुलं, बाप्पाच्या दर्शनासाठी नवी नियमावली जारी 6 दिवसांत 90 लाख लोकांचं लसीकरण किमान 15 लाख लसीकरण दररोज झालं पाहिजे. पूर्वी लस उपलब्ध होत नव्हती मप आता तशी परिस्थिती नाहीये. आत्ता आपल्याकडे 75 लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. 25 लाख आणखी उपलब्ध होतील आणि अशाप्रकारे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहेत. त्यामुळे सहा दिवसांत हा स्टॉक पूर्ण संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला आम्ही दिलं आहे असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. राजेश टोपे यांनी पुढे म्हटलं, जवळपास 100% राज्य अनलॉक होऊन सुरू झालेला आहे. लसीकरण केलं तर सीरिअस रुग्ण वाढणार नाहीत. लसीकरणाचं महत्व सर्वांनी जपावं. काही विशेष समाजाचे प्रवर्ग आहेत त्यांच्या मौलाविना धर्मगुरून यात एकत्र येऊन लसीकरण करायचं आहे. महाराष्ट्रात लसीकरणाच्या संदर्भात असलेला आपला उच्चांक आपणच मोडला पाहिजे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं, घटस्थापनेनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास, पाहा PHOTOS लसीकरण केल्यानंतर कोविड होणारच नाही असं नाही. दसरा आणि दिवाळी या सणांदरम्यान त्याचा काही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून हे लसीकरण घेत आहोत. म्युकरमायकोसीसने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार सानुग्रह अनुदान देणार आहोत. दसरा, दिवाळी हिंदु धर्मातील मोठा सण आहे. त्यानंतर कोरोना वाढेल का याबाबत शंका व्यक्त केली जातेय. नगरमध्ये आम्ही विशेष लक्ष देत आहोत, लसीकरण वाढवतोय, चाचण्या वाढवाव्या असेही सांगितलं आहे. नगरमध्येही कोविडची स्थिती नियंत्रणात येईल असंही राजेश टोपेंनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात