मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना संजय राऊत यांची डिनर डिप्लोमसी, भाजप खासदारांनाही निमंत्रण

राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना संजय राऊत यांची डिनर डिप्लोमसी, भाजप खासदारांनाही निमंत्रण

शिवसेना-भाजप खासदार संजय राऊतांच्या घरी एकत्र जमणार आहेत.

शिवसेना-भाजप खासदार संजय राऊतांच्या घरी एकत्र जमणार आहेत.

शिवसेना-भाजप खासदार संजय राऊतांच्या घरी एकत्र जमणार आहेत.

नवी दिल्ली, 24 मार्च : मनसूख हिरेन प्रकरणावरुन सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळत आहे. 'पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबद्दल  (police officer transfer racket) जो अहवाल दिला आहे तो लवंगी फटका आहे की बॉम्ब आहे हे लवकरच कळेल', अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जोरदार टोला लगावला आहे. दरम्यान शिवसेना-भाजप खासदार संजय राऊतांच्या घरी एकत्र जमणार आहेत. (Sanjay Rauts dinner diplomacy BJP MPs also invited)

संजय राऊत यांच्या घरी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मैथिली ठाकूर हिच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमसीसाठी भाजप खासदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आलं आहे.

हे ही वाचा-तो अहवाल लवंगी फटका की बॉम्ब लवकरच कळेल, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज रात्री गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे सर्व पक्षीय खासदारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. (Sanjay Rauts dinner diplomacy BJP MPs also invited) विशेष म्हणजे कार्यक्रमात भाजपच्या खासदारांना निमंत्रण पाठवण्यात आले असून शिवसेना-भाजप खासदार एकत्र येणार का याकडे लक्ष लागले आहे. गायिका मैथिली ठाकूर कार्यक्रमात सादरीकरण करणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार उपस्थित असणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

First published:
top videos

    Tags: Delhi, Sanjay raut