मुंबई, 10 जून: मुंबईतील पूर्व उपनगरात असलेल्या भांडूप (Bhandup) परिसरातील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओ दिसत आहे की फूटपाथवरून चालत जाणारी एक महिला अचानक मॅनहोलमध्ये पडते. मॅनहोलचे झाकण उघडे होते आणि फूटपाथवर पाणी साचलेले होते त्यामुळे मॅनहोल न दिसल्याने ही महिला मॅनहोलमध्ये पडली (Woman fall in manhole). या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाने मुंबई मनपाला धारेवर धरत हल्लाबोल केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज कोटक यांनी म्हटलं, डॉ अमरापूरकर यांच्या घटनेनंतरही बीएमसीने कुठलाही धडा घेतलेला नाहीये. बीएमसी कुंभकर्णाच्या झोपेतून जागी होणार का? मनपा कोणत्या मोठ्या अपघातांची वाट पाहत आहे? आणखी किती काळ लोकांच्या आयुष्याशी खेळणार आहेत? मुंबईतील मॅनहोल्सचा मुद्दा बीएमसीने गांभीर्याने घ्यायला हवा. भांडूपमध्ये घडलेल्या घटनेत महिलेचे प्राण वाचले ही आनंदाची बाब आहे पण दु:खाची बाब म्हणजे पालिकेचे अजूनही याकडे दुर्लक्ष आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) June 10, 2021
लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम; राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण
भांडूप पश्चिम येथील व्हिलेज रस्त्यावर असेलल्या एका मॅनहोलचे झाकण उघडे होते. काल झालेल्या मुसळधार पावसात पाणी साचल्याने हे उघडे मॅनहोल्स न दिसल्याने दोन महिला त्यात पडल्या. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीएमसीने तातडीने हालचाल करत पावलं उचललं आणि त्या मॅनहोल्सवर आता झाकणं लावण्यात आली आहेत.
पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. असे असले तरी, कालच्या जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जात आहे. आवश्यक तेथील मॅनहोल बदलण्याची कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती मुंबई मनपाकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.