मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम; राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम; राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण

Covid Vaccination in Maharashtra: कोरोना प्रतिबंधक लस देण्यात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी कायम ठेवली आहे.

Covid Vaccination in Maharashtra: कोरोना प्रतिबंधक लस देण्यात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी कायम ठेवली आहे.

Covid Vaccination in Maharashtra: कोरोना प्रतिबंधक लस देण्यात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी कायम ठेवली आहे.

मुंबई, 10 जून: कोरोना विरुद्धच्या लढाईत महत्त्वाचा भाग असलेली कोविड प्रतिबंधक लस (Covid Vaccine) देण्यात येत आहे. महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून आतापर्यंत राज्यात अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस (2.5 crore citizens vaccinated) देण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. तर राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक (Over 50 lakh people vaccinated with 2nd dose) आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 50 लाख 8 हजार 476 एवढी आहे.

मुंबईत तब्बल 50 हजारांहून अधिक लोकांनी नाकारला लसीकरणाचा दुसरा डोस

महाराष्ट्र पाठोपाठ उत्तरप्रदेशात 2 कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

9 जून 2021 रोजी राज्यात एकूण 3208 लसीकरणाचे सत्रे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्यात एकूण 2,97,760 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 9 जून 2021 पर्यंत एकूण 2,50,15,615 लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Maharashtra