जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / दोन लस घेऊन पण घरात बसावं लागत असेल तर मग लसीचा काय फायदा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल

दोन लस घेऊन पण घरात बसावं लागत असेल तर मग लसीचा काय फायदा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल

Bombay high court

Bombay high court

सामान्य नागरिकांसाठी (General Public) मुंबई लोकल ( Mumbai Local Train) कधी सुरु होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 ऑगस्ट: सामान्य नागरिकांसाठी (General Public) मुंबई लोकल( Mumbai Local Train) कधी सुरु होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातच मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay high court) राज्य सरकारला मुंबई लोकल ट्रेनवरुन सवाल केला आहे. कोरोनाच्या (Corona Virus) दोन लस (COrona Vaccination) घेतलेल्या नागरीकांचे काय? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला आहे. दोन लस घेऊन पण घरात बसावं लागत असेल मग लसीचा काय फायदा, असं म्हणत न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं आहे. लोकांचे प्रवासामुळे हाल होत आहेत. तासनं तास प्रवास करावा लागतोय. वाहतूक कोंडी वाढत चालली असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला म्हटलं आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही काही अडचणी असतील, असं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला म्हटलं आहे. ‘‘भविष्यात मनसेसोबत युती होऊ शकते पण…’’, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान आता वकिलांना आणि मुंबई उच्च न्यायालयातील क्लार्कना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं ही सूचना वजा विचारणा केली आहे. यावर गुरुवारी पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी सर्वसामान्यांना प्रवासास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. आज वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. वकिलांच्या संघटनेकडून ही याचिका करण्यात आली होत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात