मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pandharpur Assembly by-election : पंढपुरात भाजपची मोठी आघाडी, 25 फेऱ्यापर्यंतची संपूर्ण आकडेवारी

Pandharpur Assembly by-election : पंढपुरात भाजपची मोठी आघाडी, 25 फेऱ्यापर्यंतची संपूर्ण आकडेवारी

7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली आहे.

7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली आहे.

7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली आहे.

    पंढरपूर, 02 मे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे (Pandharpur Assembly by-election 2021) अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत 25 फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार  समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांनी तब्बल 6200 मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक होत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण आता समाधान आवताडे यांनी तब्बल 6200 मतांनी आघाडीवर आहे. सातव्या फेरीपासून समाधान आवताडे आघाडीवर आहे. भगीरथ भालके 6 व्या फेरीपर्यंत  आघाडीवर त्याआधी दुसऱ्या फेरीअखेरीस  आवताडे 114 मतांनी पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 114 मतांनी आघाडी घेतली होती.  दुसऱ्या फेरी अखेर आवताडेंना 5 हजार 492  मतं मिळाली होती. तर भगीरथ भालके यांना 5 हजार 606 मतं मिळाली. तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे होते. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली.  तर समाधान आवताडे यांना 7978 मतं मिळाली. अजित पवारांचा एक फोन अन् अर्ध्या रात्री ऑक्सिजन घेऊन पोहोचले रोहित पाटील पण, त्यानंतर डाव पलटला. 7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली आहे. आतापर्यंतचा निकाल - पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर - दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं - तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे - 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर - 5 फेऱ्या पूर्ण  भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर. - 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 100मतांनी आघाडीवर. - 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2295मतांनी आघाडीवर - 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1503मतांनी आघाडीवर. - 12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409मतांनी आघाडीवर - 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर - 17 व्या फेरी अखेर ९०१ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर - 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1209 मतांनी आघाडीवर - 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1022मतांनी आघाडीवर - 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे  3486मतांनी आघाडीवर - 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3908 मतांनी आघाडीवर - 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5807  मतांनी आघाडीवर - 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6200मतांनी आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Assembly Election 2021, Pandharpur

    पुढील बातम्या