मुंबई, 29 नोव्हेंबर: चार दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) येथील एचडीआयएल (HDIL) परिसरातील एका बंद पडलेल्या 13 मजली इमारतीच्या टेरेसवर एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून (woman dead body found on terrace) आला होता. आरोपींनी मृत मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असताना, मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिली असून हत्येपूर्वी बलात्कार केला नसल्याचं त्यांनी पोलीस चौकशीत म्हटलं आहे. तसेच मृत मुलगी लग्नासाठी दबाव टाक असल्याच्या रागातून तिची सुरा आणि हातोडीनं वार करून हत्या केल्याचं आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास विनोबा भावे नगर पोलिसांसह, कुर्ला आणि धारावी पोलीस संयुक्तपणे करत आहेत.
हेही वाचा-प्रेयसीवर बलात्कार करत होता तरुण अन् प्रियकर बनवत राहिला VIDEO, पुण्यातील घटना
नेमकं काय घडलं?
25 नोव्हेंबर रोजी काही तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ बनवण्यासाठी कुर्ला येथील एचडीआयएल परिसरातील बंद पडलेल्या 13 मजली इमारतीत गेले होते. यावेळी संबंधित तरुणांना इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपासाला सुरुवात केली. दुसरीकडे, देवनार पोलीस ठाण्यात एक मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुलीच्या नातेवाईकांना मृत तरुणीचा मृतदेह दाखवला. तो त्याच मुलीचा मृतदेह असल्याची ओळख पालकांनी पटवली.
हेही वाचा-वर्दीची शपथ घालून तरुणीवर बलात्कार; आर्मीतील पळपुट्याचा कांड वाचून बसेल धक्का
यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या मित्रमैत्रिणींकडे चौकशी केली. तसेच मृत मुलीच्या मोबाइल सीडीआरमधून गोवंडी येथील प्रियकर रयान खान (19) याच्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी प्रियकराला कुर्ला परिसरातून ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने आपल्या मित्राच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली आहे. मृत मुलगी लग्नासाठी दबाव टाकत असल्याच्या कारणातून ही हत्या केल्याचं आरोपीचं म्हणणं आहे. पोलिसांनी दोनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Murder Mystery