मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nanded: बापाने फिल्मी स्टाईलनं मुलीच्या प्रियकराचा काढला काटा; थरारक घटनेचं उलगडलं गूढ

Nanded: बापाने फिल्मी स्टाईलनं मुलीच्या प्रियकराचा काढला काटा; थरारक घटनेचं उलगडलं गूढ

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Murder in Nanded: नांदेड जिल्ह्यातील हसनाळ याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या प्रियकराची निर्घृण हत्या (Man Murdered Daughter's Boyfriend) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

नांदेड, 29 नोव्हेंबर: नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हसनाळ याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या प्रियकराची निर्घृण हत्या (Man Murdered Daughter's Boyfriend) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या मेहुण्याच्या मदतीनं तरुणाचा फिल्मी स्टाईल (Filmy Style murder) पद्धतीनं काटा काढला होता. हत्येच्या एक महिन्यानंतर, थरारक घटनेचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) आहेत. संबंधित आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास मुक्रमाबाद पोलीस करत आहेत.

सुर्यकांत नागनाथ जाधव असं हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.मु) येथील रहिवासी होता. मृत सुर्यकांत याचं गेल्या काही दिवसांपासून गावातील आणि नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. प्रेमप्रकरण सुरू असताना त्यांच्या संबंधाचा सुगावा प्रेयसीच्या वडिलांना लागला. वादावादी झाल्यानंतर, सुर्यकांत गाव सोडून निघून गेला. पण गाव सोडून चार महिने उलटल्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी सुर्यकांत पुन्हा आपल्या गावी येत होता.

हेही वाचा- प्रेयसीवर बलात्कार करत होता तरुण अन् प्रियकर बनवत राहिला VIDEO, पुण्यातील घटना

मुलीचा प्रियकर पुन्हा गावात येत असल्याची माहिती प्रेयसीचे वडील माधव सोपान थोटवे यांना मिळाली. त्यामुळे संतापलेल्या माधव यांनी आपले मेहुणे पंढरी गवलवाड याच्याशी संगनमत करून सुर्यकांतच्या हत्येचा कट रचला. आरोपींनी गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरच सुर्यकांत जाधव याला अडवलं आणि रावणगाव शिवारातील शेतात नेऊन त्याची निर्घृण हत्या केली. तसेच हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीनं शेतातच खोल खड्डा करुन त्यात सुर्यकांतचा मृतदेह पुरला.

हेही वाचा-वर्दीची शपथ घालून तरुणीवर बलात्कार; आर्मीतील पळपुट्याचा कांड वाचून बसेल धक्का

आपला भाऊ घरी येत नाही. तसेच त्याचा फोनही बंद लागत आहे. यामुळे मृत सुर्यकांतच्या भावाने त्याला सर्वत्र शोधलं. पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. शेवटी मृताच्या भावानं मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या अधारे तपास करत अखेर खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास मुक्रमाबाद पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Murder, Nanded