जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईसह 6 जिल्ह्यांना RED Alert; शनिवारी अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह 6 जिल्ह्यांना RED Alert; शनिवारी अतिवृष्टीचा इशारा

नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वाशी, बेलापूर, पनवेल भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वाशी, बेलापूर, पनवेल भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

महाराष्ट्राच्या 6 जिल्ह्यांमध्ये वेधशाळेने RED ALERT जारी केला आहे. मुंबईतही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 जुलै : जून अखेरीला विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार आगमन केलं आहे. कोकणात शुक्रवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असताना आता महाराष्ट्राच्या 6 जिल्ह्यांमध्ये वेधशाळेने RED ALERT जारी केला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक या 6 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने (IMD)अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. तिथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. येत्या 48 तासात कोकण गोव्यासह पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. पुणे आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गॅलरीतून दिसते अर्धी मुंबई! पाहा कतरिनाच्या घराचे INSIDE PHOTOS यंदाच्या मान्सूनमध्ये पहिल्याच जोरदार पावसात मुंबई तुंबली. दक्षिण आणि पश्चिम उपनगरांमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. त्यात भरतीची वेळ असल्याने मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागला नाही. हवामान खात्याने शुक्रवारीसुद्धा मुंबईसाठी Orange alert दिला होता. आता शनिवारसाठी मात्र याहून अधिक पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घरातच थांबावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनची व्याप्ती वाढली, नियम कडक करण्यासाठी आणखी दोन जिल्ह्यांनी घेतला निर्णय मुंबई शहर, मध्यवर्ती भागात शुक्रवारी 70 मिमी पाऊस पडला. मुंबईला व किनारपट्टीवर 24 ते 48 तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. संकलन - अरुंधती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात