मुंबई, 10 ऑगस्ट: मागील जवळपास तीन आठवड्यांपासून राज्यातून पाऊस (Rain in Maharashtra) पूर्णपणे गायब आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पण आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होतं आहे. आज विदर्भात (Rain In Vidarbha) सर्वत्र हवामान खात्याकडून (IMD) येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. कालही याच भागात हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. आजही याठिकाणी हीच स्थिती कायम आहे. संबंधित अकरा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आज संबंधित जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आकशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-डेल्टाहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांच मत
मराठवाड्यात विजांचा कडकडाट पण पावसाची शक्यता कमी
मागील बऱ्याच दिवसांपासून मराठवाड्याचा चांगल्या पावसाची आतुरता लागली आहे. खानदेश आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. आहे. मराठावाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या आठ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचं प्रमाण अधिक असणार आहे. या ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित आठ जिल्ह्यांमध्ये सायंकाळनंतर एक-दोन ठिकाणी हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-इबोला अन् कोरोनाहून घातक विषाणूचं जगावर संकट; मारबर्ग विषाणूबाबत WHOने केलं सावध
काय असेल मुंबईतील हवामान?
आज पहाटे मुंबईसह ठाणे आणि रायगड परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यात पहाटे काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस कोसळला आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात अंशतः ढगाळ हवामान होतं. त्यामुळे आज मुंबईत पावसाची शक्यता जवळपास नाही. हवामान खात्याकडून मुंबईला कोणाताही इशारा देण्यात आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.