दुसरीकडे गेल्या तीन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडली होती. रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र आज सकाळी नदीची पाण्याची पातळी एक मीटरने कमी झाल्यामुळे तूर्तास धोका टळलेला आहे. सध्याची जगबुडी नदीची पाण्याची पातळी 6.30 मीटर एवढी आहे Video: काही तासांच्या पावसामुळे मुंबईजवळ भयंकर दृश्य; पालिकेकडून दुर्लक्ष, नागरिक भयभीत दरम्यान, पुढील 4 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.Maharashtra | Waterlogging in the Sion area of Mumbai in the wake of heavy rains in the city pic.twitter.com/HCEhnDrc7M
— ANI (@ANI) July 4, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Rain updates