मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

येत्या मंगळवारी या भागात मुंबईत 15 टक्के पाणी कपात; पाणी जपून वापरा, पालिकेचं आवाहन

येत्या मंगळवारी या भागात मुंबईत 15 टक्के पाणी कपात; पाणी जपून वापरा, पालिकेचं आवाहन

गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Water cut in Mumbai City: मुंबई पालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation) पाणी पुरवठ्यासंदर्भात मुंबईकरांना महत्त्वाची सूचना दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 31 जुलै: मुंबई पालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation) पाणी पुरवठ्यासंदर्भात मुंबईकरांना महत्त्वाची सूचना दिली आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी मुंबईतल्या काही भागात पाणी कपात (Water cut) होणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. पालिकेनं म्हटलं आहे की, मंगळवारी, 3 ऑगस्ट रोजी मुंबईच्या काही भागात पाणी वितरीत करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीची कामं (Repair works on pipelines) करण्यात येणार आहे.

दुरुस्तीच्या कामादरम्यान संबंधित भागातल्या नागरिकांना 14 तास पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. या भागात सकाळी 8.30 ते रात्री 10.30 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.

बीएमसीने (BMC) पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानं अंधेरी (पूर्व, पश्चिम), राम मंदिर, कुर्ला, घाटकोपर आणि गोरेगाव या भागात पाणी कपात असणार आहे. तसंच मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील सर्व वॉर्ड, एफ उत्तर आणि एफ दक्षिण वगळता, दिवसभरात 15 टक्के पाणी कपात असेल असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

3 ऑगस्ट रोजी शहर आणि पश्चिम उपनगरांमध्ये 15% पाणी कपात. कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि गोरेगांवातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा नाही. पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन, असं ट्विट मुंबई पालिकेकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा- कोरोनाला संपवायचं आहे?, यावर WHO चे अध्यक्ष म्हणतात...

पालिकेनं नागरिकांना पाण्याचा काळजीपूर्वक आणि सावधगिरीने वापर करावा, असं आवाहनही केलं आहे. के-पूर्व, के-पश्चिम, पी-दक्षिण, एल आणि एन वॉर्डमधील काही भागात पाणी येणार नाही आहे. तर के पूर्व आणि पी-दक्षिणमधील काही भागात मंगळवारी 3 ऑगस्टला कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होईल.

First published:

Tags: BMC, Mumbai, Mumbai muncipal corporation, Water blocking, Water crisis